सोलापूर- आदर्श,सिंचन घोटाळ्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. भ्रष्ट्राचारी सरकारमुळे राज्याचा विकास थांबला आहे. रस्ते, वीज पाण्याचे प्रश्न गंभीर बनले आहे.
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच सक्षम पर्याय आहे. लोकसभेला जशी साथ दिली तशीच साथ आता द्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड यासारख्या राज्यांचा चेहरामोहरा बदलला. आता महाराष्ट्रातही बदल घडवून आणू, असा विश्वास केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केला.
शहर मध्यचे भाजपचे उमेदवार प्रा. मोहिनी पतकी यांच्या प्रचारार्थ लष्कर येथील जगदंबा चौकात शनिवारी आयोजित जाहीर सभेत उमा भारती बोलत होत्या. राज्य सरकारच्या भ्रष्ट्राचारी कारभारावर टीका करताना त्या म्हणाल्या, सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेल्या पैशात राज्य सरकारने घोटाळा केला. जनतेचे पैसे सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. राज्याचे आरोग्यच बिघडलेले आहे. दवाखाने आहेत, पणऔषध नाही, शाळा आहे, पण, िशक्षण नाही, युवक आहेत, पण, रोजगार नाही असे स्थिती आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जनधन योजने अंतर्गत सहा महिन्यात सर्वसामान्यांची बॅकेत खाती उघडली. ६० वर्ष ज्यांना जमेल नाही, ते भाजप सरकार करत आहे, असेही त्या म्हणाल्या.
मोदीविकासाचे नायक : राज्यातआदर्श घोटाळा, टेलिफोन घोटाळा झाले असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मला काहीच माहीत नाही असे म्हणत होते. दुसरीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात, मी कोणाला खाऊ देणार नाही आणि खाणार नाही. आम्ही रस्ते, वीज, पाण्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवू. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी होते तर देशाचा विकासाचे नायक पंतप्रधान मोदी आहेत. देशाची शान असलेली गंगा नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी सरकारने उचललेली आहे. तीन वर्षात गंगा स्वच्छता केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.
मेड इन इंडिया'चा नारा
यावेळी उभा भारती यांना सोबत घेऊन निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले. त्यावेळी प्रा. पतकी या भावनिक झाल्या. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले.
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी भाजपच्या हाती सत्ता देण्याची गरज आहे. आमची लढाई भ्रष्टाचार, बेरोजगार आणि विकास यावर आहे. त्यासाठी युवकांची ताकद आवश्यक आहे. "मेड इन इंडिया'चा नारा देण्यासाठी भाजपला साथ द्या असे म्हणाल्या. यावेळी प्रा. मोहिनी पतकी, नगरसेविका जुगूनबाई अंबेवाले, सुरेखा अंजिखाने, विजया वड्डपेल्ली, श्रीकांचना यन्नम, नागेश वल्याळ, पांडुरंग दिड्डी आदी उपस्थित होते.