आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त हवालदाराच्या घरात झाली चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पुणे रस्ता केगाव येथे राहणारे निवृत्त पोलिस हवालदार सदाशिव अवचारे यांच्या घरात चोरी झाली. मागील आठ दिवसांपासून ते लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. जिन्यावरील दरवाजा उचकटून चोरटे आत आले.
शनिवारी सायंकाळी ते परत आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. एक एलसीडी टीव्ही, सिलिंडर टाकी, साड्या अन्य साहित्य असा तीस हजारांचा ऐवज गेला आहे. चोरटे जिना दरवाजा उचकटून आत आले. जाताना पाठीमागील दरवाज्याने गेले. घर आठ दिवस बंद असल्याची संधी साधून चोरांनी डाव साधला. ठसे घेतले आहेत. श्वानपथकही आले होते. तपास सुरू असल्याची माहिती फौजदार चावडीचे सहायक निरीक्षक जनार्दन साळुंखे यांनी दिली.