आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Contaminated Water Risen; Administration Says, 'No Need To Worry'

दूषित पाण्याचे प्रमाण वाढले; प्रशासन म्हणते, ‘चिंता नाही’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-शहरात दूषित पाणी नमुन्याचे प्रमाण वाढले आहे. जानेवारीत 155 नळांतील पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी 19 नमुने दूषित आढळले. टक्केवारीत हे प्रमाण 12.15 असून एरवी ते 10 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असा निकष आहे. घाबरून जाण्याचे कारण नसले तरी ही स्थिती काळजीची नक्कीच आहे, असे सूत्रांनी सांगितले. मागील वर्षाच्या तुलनेत हा उच्चांकी आकडा आहे.
शहराला प्रामुख्याने उजनी धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. काही भागांत हिप्परगा तलावातून पुरवठा केला जातो. कुमठा नाका परिसर, जुळे सोलापूर, हद्दवाढ भागात काही ठिकाणी नळांना काहीसे पिवळसर पाणी येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, चिंता करण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. उजनी धरणात मळी मिर्शित पाणी येत आहे. ते पाणी टाकळी बंधार्‍यातून सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात येते. त्याचा हा परिणाम असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी कुमठा नाका परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याचे नमुने महापालिका आरोग्य विभागाने तपासले. 10 पैकी 5 ठिकाणचे नमुने दूषित होते. जानेवारी महिन्यात 12.25 टक्के पाणी दूषित असल्याचे अहवालात स्पष्ट झाले.
नगरसेवकांना मिळेना मनपाकडून नळजोडणी
पाणी पिवळसर असले तरी ते पिण्यास योग्य आहे. पाण्याचे घेतलेले नमुने एकाच भागातील आहे. त्यामुळे ते प्रमाण 12.25 टक्के इतके आहे. कुमठा नाका परिसरात जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे पाणी दूषित आढळले. दुरुस्ती केली.’’ विजय राठोड, प्रभारी सार्वजनिक आरोग्याधिकारी
बोगस नळ अधिकृतसाठी आलेले अर्ज (कंसात अधिकृत केलेली संख्या)
991 नळ झाले अधिकृत
शहरात बोगस नळ शोधण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. बोगस नळ असलेल्या 72 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. बोगस असल्यास अधिकृत करून घेण्यासाठी महापालिकेने नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार 1554 जणांनी अर्ज केले. त्यापैकी 991 जणांचे नळ अधिकृत करून देण्यात आले. तर 563 जणांचे नळ अधिकृत होत नसल्याने ते प्रलंबित आहेत. यातून महापालिकेस 40 लाख रुपये उत्पन्न मिळाले. तर दरवर्षीच्या उत्पनात 28 लाखांनी भर पडली.