आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Continue Boycott On University's Examination By Non Teaching Staff

शिक्षकेतर कर्मचा-यांचे विद्यापीठाच्या परीक्षांवर बहिष्कार कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेवरील बहिष्कार कायम राहील, असे महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर. बी. सिंह यांनी जाहीर केले आहे.

पुणे येथील नौरोसजी वाडिया महाविद्यालयात झालेल्या महासंघाच्या कार्यकारिणी सभेत हा निर्णय घेण्यात आला. तसेच महाविद्यालयातील प्रयोगशाळा व ग्रंथालय परिचरांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत देण्यात येणा-या पदोन्नती ग्रेड-पे संदर्भात राज्याचे प्रभारी उच्च शिक्षण संचालकांनी 2 मार्च 2013 रोजी काढलेले परिपत्रक चुकीचे व दिशाभूल करणारे असून यामुळे अनेक कर्मचा-यांचे अतोनात नुकसान होणार आहे. यात परिचरांना त्यांनी शालांत परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. हे परिपत्रक रद्द करण्याचा ठराव महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या सभेत मंजूर करण्यात आला. तसेच राज्य शासनास कळवण्यात येणार आहे. या बैठकीस कॉलेज कर्मचारी युनियन जिल्हा सोलापूरचे अध्यक्ष राजेंद्र गोटे, सरचिटणीस अजित संगवे, शशिकांत दुनाखे, माणिक लिगाडे, राजेंद्र गिड्डे, शब्बीर शेख आदी सदस्य उपस्थित होते.