आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजार सहकारी संस्थांची चौकशी करणार, सहकारमंत्री पाटील यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - राज्यातील एक हजार सहकारी संस्थांच्या कारभाराची निवृत्त अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.

चेंबर आॅफ कॉमर्सच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. ‘एक हजार सहकारी संस्थांच्या गैरकारभाराचा अहवाल आमच्याकडे आला आहे. या सर्व संस्थांची चौकशी सहकार खात्यामार्फत करायला तेवढे अधिकारी नाहीत. त्यामुळे निवृत्त अधिकाऱ्यांची समिती नेमून चौकशी केली जाईल,’ असे पाटील यांनी सांगितले.

टोलच्या धोरणाबाबत ते म्हणाले, ‘यापुढेही सरकारला बीओटी तत्त्वावर मोठी विकासकामे करावीच लागतील. सरकारकडे स्वत: मोठी कामे करावीत एवढा पैसा नाही. दाेनशे कोटींच्या आतील कामे मात्र सरकार स्वत: करेल. कोल्हापुरातील टोल एक मेपासून बंद होईल,’ अशी घाेषणाही पाटील यांनी केली. ‘सध्या काम सुरू असलेल्या सांगली-कोल्हापूर रस्त्यावर पहिल्या दिवसापासून लहान वाहनांना टोलमुक्ती असेल. त्याचा बोजा मोठ्या वाहनांवर पडेल; पण या कामाला खर्च मोठा आल्याने संपूर्ण टोलमाफी शक्य नसल्याचे पाटील म्हणाले. सांगलीतील वसंतदादा पाटील मार्केट यार्डाला समांतर बाजारपेठ उभारण्याचेही त्यांनी संकेत दिले.