आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporation Forecast,Latest New In Divya Marathi

मनपाचे यंदाही असेल फुगवट्याचे बजेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करताना यंदाही प्रत्यक्ष उत्पन्न स्रोतापेक्षा अधिक उत्पन्न दाखवून बजेट फुगवले जाण्याची शक्यता अधिक आहे. प्रशासनाने सादर केलेल्या बजेट इतकेही उत्पन्न प्रत्यक्षात संकलित होत नसल्याचा मागील काही वर्षांचा अनुभव आहे. केवळ अंदाजपत्रकात खर्चाच्या तरतुदी करायच्या पण निधी नसल्याने काम करता आले नाही, असे सांगून वेळ मारून नेण्याचा हा प्रकार आहे.
मनपाच्या 2011-12, 2012-13 व 2013-14 या तीन वर्षात 233.05 कोटींची तूट आलेली आहे. मनपा सभागृहात उत्पन्न स्त्रोत्र वाढवण्यासंदर्भात सूचना- उपसूचनांपेक्षा खर्च तरतुदींच्या मागणीवर नगरसेवक आणि नेत्यांचा अधिक भर असतो. यंदा विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने युजर चार्ज, एलबीटी व 50 टक्के पाणी कपात आदी सवलतींचा वर्षाव केला जाऊ शकतो. तूट भरून काढण्यासाठी बोगस मिळकती, नळ, मनपा इमारतीची भाडेवाढ, मोठय़ा थकबाकी वसुलीकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.