आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीप्रश्नी, अधिकाऱ्यांचे हाताची घडी तोंडावर बोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील पाणीपुरवठ्यातील त्रुटी दूर करून दोन दिवसांआड पाणी देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत उपाय योजना सूचविण्यासाठी शुक्रवारी मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी मनपा अधिकारी- पदाधिकाऱ्यांसह तज्ज्ञांची बैठक बोलावली होती. यावेळी पदाधिकारी आणि तज्ज्ञांनी मते मांडली. पण प्रत्यक्ष यंत्रणा हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना काही सुचवता आले नाही.
मनपा आयुक्तांच्या कक्षात बैठक झाली. यात भाजप-बसपच्या नगरसेवकांसह शहर पाणीपुरवठ्यासंदर्भात माहिती असलेल्या तज्ज्ञांनी सहभाग घेतला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत प्रश्न विचारले. मला अनुभव कमी आहे, मला माहीत नाही, असे उत्तर सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी दिले. याशिवाय सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत इतर अधिकारी काहीच बोलले नाहीत. पाणीपुरवठ्याबाबत माहिती नसेल, काम जमत नसेल तर अशा पदाधिकाऱ्यांना घरी बसवा अशी मागणी केली. यावेळी अंबऋषी रोडे यांनी बोगस नळजोड शोधण्याची सूचना केली.

दोन दिवसांत अहवाल द्या : आयुक्त
पाणीपुरवठ्याचाअहवाल दोन दिवसांत सादर करा, असे आदेश मनपा आयुक्त काळम-पाटील यांनी दिले. चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. चावीवाल्यांनी व्यवस्थित काम केल्यास त्यांना घरी बसविले जाईल. दोन दिवसांआड करण्याचा प्रयत्न आहे. सरकारकडे पाणीपुरवठ्यातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची मागणी केली असल्याचे काळम-पाटील यांनी सांगितले.

पाणीगळती रोखण्याची गरज
उजनीयेथून पाकणीपर्यंत ८० एमएलडी पाणी येते. त्यानंतर केवळ ५६ एमएलडी पाणी शहराला मिळते, उर्वरित पाणी कुठे जाते, असा मुद्दा उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी उपस्थित केला.

सार्वजनिकनळांना तोट्या बसवा
एमआयडीसीलापाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पाणी वितरीत करायची नाही. यासाठी महापालिकेला दीड कोटी रुपये मोजावे लागतात. त्याचा आयुक्तांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक जगदीश पाटील यांनी केली. सार्वजनिक नळांना तोट्या लावण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.

चर्चेतयांचा होता सहभाग
शहराच्यापाणीपुरवठ्याचे चार भाग करून चारही उपायुक्तांना जबाबदारी द्या, जलवाहिनी टाकण्यावर नियंत्रण ठेवा, असे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सांगितले. या चर्चेत तज्ज्ञ अरुण शेटे, माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, विश्वनाथ बेंद्रे यांनी सहभाग घेतला.
बातम्या आणखी आहेत...