आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेस सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोन्या मारुती मंदिर ते माणिक चौक रस्त्यावर वाढीव बांधकाम महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने बुधवारी पाडले. सकाळी सात वाजता सुरू झालेल्या मोहिमेस पोलिस बंदोबस्त होता.
इमारती समोरील मोकळ्या जागेत फ रशा घालून तसेच जुने कठडे आणि भिंती न पाडता त्याची दुरुस्ती केली होती. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडचण येत होती. कन्हय्यालाल मेडिकल ते युनिक हॉस्पिटलपर्यंत बॅरेकेट लावून रस्ता बंद करण्यात आला होता. मोहिमेत अभियंता डी. भादुले, आर. डी. जाधव, वसंत पवार, नजीर शेख, प्रकाश सावंत आदी होते.


दोघांना दिली गुरुवारपर्यंतची मुदत
संजय डेअरी आणि हिबारे दुकान रस्त्यावर आहेत. त्यांना यापूर्वी अनेकवेळा सूचना देण्यात आल्या होत्या. सध्या त्यांना गुरुवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत त्यांनी दुकाने काढून घेणे, अन्यथा महापालिका काढेल असे सांगण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाचे अधिकारी वसंत पवार यांनी दिली.


इमारतींमधील वाहनतळाच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष
नवीन बांधकामात वाहनतळाची जागा दाखवली जाते. प्रत्यक्षात त्याचा वापर अन्य कामांसाठी किंवा व्यावसायिक कामासाठी होतो. अशांनी स्वत: किंवा महापालिकेने ते अतिक्रमण काढावे. अन्यथा प्रति वर्षी प्रति चौरस फूट 100 रुपये दंड आकारावा, अशी सूचना जुलै 2008 मध्ये आयुक्त देवणीकर यांनी दिली होती. याला अनुसरून बांधकाम विभागाने 481 जणांची यादी तयार करून दंड वसूल करण्यासाठी कर विभागाला दिली. कर विभागाने जेवढे शक्य होईल तेवढा दंड वसूल केला आणि ते अनधिकृत बांधकाम असल्यामुळे पाडावे अशा आशयाचा पत्रव्यवहार बांधकाम विभागाशी केला. मात्र, नंतर कोणीही कसलीही कारवाई केली नाही, असे आर. आर. जोशी
(रा. लकी सोसायटी, होटगी रस्ता) यांनी सांगितले.


मोहीम जारी राहणार
अतिक्रमण कारवाई ही फक्त बुधवारच्या दिवशीची नाही. ही मोहीम सुरूच राहणार. पुढील टप्पा गुरुवार-शुक्रवारी सुरू करण्यात येणार असून नवी पेठ आणि लक्ष्मी मार्केट येथे कारवाई सुरू होणार आहे. तसेच पार्किंगच्या जागेवरील झालेले अतिक्रमण करणा-यांकडून दंड वसूल करण्याची जबाबदारी कर विभागाकडे सोपवण्यात आली होती.’’
आर. डी. जाधव, उपअभियंता