आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचा 53 कोटींनी फुगले बजेट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात 53 कोटी 49 लाख रुपयांची वाढ करत पक्षनेता चेतन नरोटे यांनी 773 कोटी 56 लाख 84 हजार रुपयांचे अंदाजपत्रक गुरुवारी स्थायी समितीत मांडले. आयुक्त अजय सावरीकर यांनी 12 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीकडे 720 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. विरोधी पक्षाने 806 कोटींचे अंदाजपत्रक मांडले. आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात बदल करत स्थायी समितीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर स्थायी समिती सभापती इब्राहिम कुरेशी यांनी बहुमताने मंजूर करून सर्वसाधारण सभेकडे पाठवले. स्थायीने 31 तर विरोधी पक्षाने 36 सूचना आणि शिफारसी केल्या. कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसलेले हे अंदाजपत्रक असले तरी आयुक्तांच्या अंदाजपत्रकपेक्षा स्थायीने एलबीटी उत्पन्नात 30 कोटी, भूमी व मालमत्ता उत्पन्नात दोन कोटी रुपयांची कपात केली तर नगर अभियंता, हद्दवाढ, आरोग्य, सर्वसाधारण कर वसुलीत वाढ केली.


रुसवा-फुगवा
निधी देण्यावरून सत्ताधारी पक्षात गुरुवारी रुसवा आणि फुगवा पाहण्यास मिळाला. स्थायी समिती सदस्य नागेश ताकमोगे, पद्माकर काळे, किशोर माडे यांनी अंदाजपत्रकला विरोध करण्याची तयारी दर्शवली होती, पण सत्ताधार्‍यांनी त्यांची मनधारणी केली.
यासाठी आहे तरतूद
1.5 लाख रुपये पालिका सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करण्यासाठी
स्थायीतील अंदाजपत्रक कोटीत (आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक)
महसूल जमा 320.30 (292.80)
पाणीपुरवठा 62.08 (62.08)
अखेरची शिल्लक 0.4 (0.4)
भांडवली कामे 63.51 (37.51)
अनुदानातून कामे 181.02 (181.02)
कर्ज विभाग 142 (142)
विशेष अनुदान 2.5 (2.5)
शासकीय अनुदान 0. 10(0. 10)
विकासकामाचे अनुदान 2 (2)


स्थायीत सादर केलेले अंदाजपत्रक बोगस आहे. सत्ताधार्‍यांनी उत्पन्नाचे स्रोत सांगितले नाहीत. नागरिकांना दिलासा देणारे अंदाजपत्रक नसून यात निधीची पळवापळव आहे. शॉपिंग सेंटरचे भाडे वाढवण्यापेक्षा कमी केले. आम्ही 804 कोटींचे अंदाजपत्रक मांडले, त्यात वस्तुस्थिती आहे. उत्पन्नाचे साधन सांगितले आहे. अंदाजपत्रक जनतेच्या फायद्यासाठी नसल्याचे दिसून येते.’’ सुरेश पाटील, विरोधी पक्ष सदस्य


स्थायीत सादर केलेला अंदाजपत्रक समाधानकारक असून, आवश्यक त्या ठिकाणी वाढ सुचवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी कपात करण्यात आली आहे.’’ चेतन नरोटे, पक्षनेता, स्थायी समिती