आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporators Agitation For Water Before Municipal Corporation

पाण्यासाठी नगरसेवकांचे महापालिकेत उपोषण - शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा सहभाग नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - शहरात चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. विडी घरकुल परिसरात आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.महापालिकेत िनर्णय घेण्यासाठी सक्षम आयुक्त नसल्याने महापालिकेची यंत्रणा कोसळली आहे. आर्थिक स्थिती ढासळली आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि आयुक्तांची नेमणूक व्हावी म्हणून नगरसेवक सुरेश पाटील, आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली नऊ नगरसेवकांनी महापालिका आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी उपोषणास सुरुवात केले. खासदार अॅड. शरद बनसोडे, महापौर सुशीला आबुटे यांनी मध्यस्थी करून आंदोलन संपवले.

शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. परीक्षांचे दिवस असल्याने घरात पाण्यामुळे चिडचिडेपणा येत असल्याने त्यांचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा. तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदली होऊन दोन महिने झाले तरीही नवीन आयुक्त नसल्याने मनपाच्या कामकाजावर परिणाम होत आहेत. मनपात नागरिकांची कामे होत नाहीत. त्यामुळे नवीन आयुक्त तत्काळ मिळावा म्हणून नगरसेवक सुरेश पाटील, आनंद चंदनशिवे, रोहिणी तडवळकर, श्रीकांचना यन्नम, माशप्पा विटे, महादेवी अलकुंटे, सुनंदा बल्ला, सुनीता भोसले, उषा शिंदे यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही उपोषणात सहभागी झाले होते. सायंकाळी खासदार अॅड. शरद बनसोडे, महापौर आबुटे, माजी आमदार नरसय्या आडम, अॅड. संजीव सदाफुले यांनी उपोषणस्थळी जाऊन योग्य आश्वासन दिल्याने आंदाेलन संपले.

सभागृहात ओरडणारे आंदोलनात नाहीत
पाण्याबाबतबुधवारी आंदोलनात पक्षीय रंग आणता सर्वपक्षीय आंदोलन नगरसेवक पाटील आणि चंदनशिवे यांनी पुकारले होते. त्यात अनेक नगरसेवक सहभागी झाले नाहीत. सभागृहात पाण्यासाठी ओरडणारे उपोषणस्थळाकडे फिरकले नाहीत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचा एकही नगरसेवक सहभागी नव्हता.

मनपा आयुक्त नेमा आणि पाणीपुरवठा सुरळीत करा, या मागणीसाठी भाजपचे जेष्ठ नगरसेवक सुरेश पाटील, बसपाचे आनंद चंदनशिवे यांच्यासह नऊ नगरसेवकांनी बुधवारी आंदोलन केले. सायंकाळी खासदार शरद बनसोडे, महापौर सुशीला आबुटे यांच्या सामोपचाराने आंदोलन मागे घेतले.