आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporators Of BJP Run To Urban Development Department

पदाधिकाऱ्यांच्या निधीविरुद्ध भाजपची नगरविकासकडे धाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी पाच पदाधिकाऱ्यांसाठी सुमारे वीस कोटींचा विकास निधी राखीव ठेवला आहे. त्यास विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने हरकत घेतली आहे. इतकेच नव्हे तर याच्याविरुद्ध राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे तक्रार करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

महापालिका मुंबई अधिनियम कायद्यात अशी तरतूद नाही. तसेच राज्यातील अन्य कोणत्याही महापालिकेत अशा पद्धतीने निधी राखून ठेवलेला नाही. महापालिका आर्थिक कचाट्यातून जात असताना, पदाधिकाऱ्यांनी मात्र अंदाजपत्रकात आपल्या नावाने १९.५ कोटी रुपये आपल्या कोट्यासाठी तरतूद करून ठेवली.

राज्यात कोणत्याही शहरात पदाधिकारी निधी नसताना सोलापुरात मात्र खिरापत वाटली जात आहे. हा निधी पदाधिकारी आपल्या मर्जीनुसार देतील, त्यामुळे शहराचा समतोल विकास होण्यास अडचण येणार आहे. या निधीच्या विरोधात भाजप नगरविकास खात्याकडे तक्रार करणार आहे. याबाबतचे वक्तव्य भाजपचे नगरसेवक प्रा. अशोक निंबर्गी यांनी केले.

सुविधांसाठी निधी
पदाधिकारीशहरातील विविध भागात फिरत असताना तेथील नागरिकांची नागरी सुविधांसाठी मागणी असते. त्यामुळे तेथील सुविधा देण्यासाठी निधीची आवश्यकता असते. त्यासाठी अंदाजपत्रकात निधी ठेवला जातो. याची तरतूद करताना शासनाची मान्यता आवश्यकता नाही.” प्रवीणडोंगरे, उपमहापौर

तक्रार करणार
पदाधिकाऱ्यांसाठीठेवण्यात आलेले १९.५ कोटी रुपये निधी ठेवता येत नाही. त्यामुळे शहराचा समतोल विकास होत नाही. अंदाजपत्रकात ठेवलेल्या निधीच्या विरोधात आम्ही नगरविकास खात्याकडे तक्रार करून तो निधी रद्दबातल ठरवावा अशी मागणी करणार आहोत.” प्रा.अशोक निंबर्गी, भाजप नगरसेवक
सुरुवातीला चांगला असलेला उद्देश भरकटला
महापौरनिधी राखीव ठेवण्याची पद्धत सुरू झाली, ती शहराच्या समतोल विकासासाठी. एखाद्या योजनेपासून किंवा मोठ्या कामापासून काही भाग वंचित राहात असतो. त्यामुळे तेथील कामे पूर्ण करण्यासाठी या राखीव निधीचा उपयोग केला जातो. त्यामुळे मुख्य कामात नसलेली मात्र, त्याच्याशी संबंधित असलेली कामे करणे यात अपेक्षित आहे. मात्र, पदाधिकारी हा निधी आपल्याच वॉर्डातील विकासकामे करण्यात खर्ची घालतात, असा अनुभव आहे. मग, पदाधिकारी कोणीही असो.