आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corruption Issue At Solapur Hospital, Divya Marathi

टाक्या खरेदी केल्या, पण ‘सिव्हिल’ला दिल्या नाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) पाण्याच्या प्लास्टिक टाक्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. सिव्हिल हॉस्पिटलसाठी प्लास्टिकच्या चार टाक्या खरेदी करण्यात आल्या. मात्र, त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बसवल्या गेल्या नाहीत.
‘पीडब्ल्यूडी’ने दोन लाख रुपयांच्या चार टाक्या 2012 मध्ये खरेदी केल्या. त्या कोठे गेल्या याची नोंद नाही. विशेष म्हणजे, टाक्यांची मागणी नोंदवल्याचा किंवा नवीन टाक्या घेतल्याचा नकार सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे. त्यामुळे ‘पीडब्ल्यूडी’चे धाबे दणाणले आहे. दुसरीकडे ‘पीडब्ल्यूडी’चे अधिकारी याविषयी माहिती देण्याबाबत हात वर करत आहेत.
गैरकारभारने अनेक प्रश्न
‘पीडब्ल्यूडी’च्या या कारभाराने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हॉस्पिटल प्रशासनाने मागणी न करताच टाक्यांची खरेदी कशी झाली? हॉस्पिटलमध्ये टाक्या बसवल्या असतील तर त्याची माहिती प्रशासनाला का दिली गेली नाही? टाक्या बसल्या असतील तर त्याची पोच हॉस्पिटल प्रशासनाकडून घेतली का नाही? हॉस्पिटलसाठी घेतल्या आणि बसवल्या नसतील तर त्या कोठे गेल्या? याची समाधानकारक उत्तरे पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ व प्रमुख अधिकार्‍यांना देता आलेली नाहीत.