आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corruption News In Marathi, Illegal Road Tax Collection , Divya Marathi

लोकवर्गणीतून बांधलेल्या कच्च्या पुलावर बेकायदेशीर टोलवसुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवारांच्या माढा मतदार संघात, उजनी धरण क्षेत्रात येणार्‍या पोमलवाडीत (ता. करमाळा) गावपुढार्‍यांनी लुटीची एक नामी युक्ती शोधून काढली आहे. लोकवर्गणीतून बांधलेला कच्चा पूल आणि रस्त्यावर बाहेरगावच्या वाहनांकडून अव्वाच्या सव्वा बेकायदेशीर टोल आकारणी केली जात आहे. टोलीधाडीमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत नागरिकांची कशी लूट सुरू आहे, याचे पोमलवाडीतील हा बेकायदेशीर टोलनाका त्याचे बोलके उदाहरणच ठरावा.
पोमलवाडीतील प्रतिष्ठित पुढार्‍यांनी पुलासाठी 25 लाख रुपये खर्च केल्याच्या दावा केला आहे. या टोलवसुलीचा ना हिशेब आहे ना लेखापरीक्षण. त्यामुळे करमाळा तालुक्यातून जवळच्या रस्त्याने पुणे जिल्ह्यात जाणार्‍यांची बेसुमार लूट सुरू आहे. युती शासनाच्या काळात निधी कमी पडल्यावर पोमलवाडी ग्रामस्थांनी लोकवर्गणतून हा कच्चा पूल उभारला. आता याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवून शासनाचा निधी ठेकेदारांच्या खिशात घालण्याचा घाट घातला आहे. फक्त पोमलवाडी ग्रामस्थांना टोलमधून सूट आहे. पूलची उभारणी चांगली असली तरी बेकायदा टोलवसूली सुरू आहे.
पोमलवाडी ग्रामस्थांना केत्तूर नं. 2 येथे तीन-चार किलोमीटरचा वळसा घालून पोहोचावे लागे. त्यामुळे गावकर्‍यांनी धरणाच्या पाण्यात भराव टाकून कच्च रस्तावजा पूल बनवला. छोट्या तसेच दुचाकी वाहनांना वाहतुकीची परवानगी दिल्याने पुणे जिल्ह्यातून केत्तूरकडे जाणार्‍यांची सोय झाली. वाढती वर्दळ पाहून ही टोलशक्कल सुचली. मग बाहेरगावच्या गाड्यांकडून लोकसहभागाच्या नावाखाली बेकायदा टोल आकारला जाऊ लागला. गावातील प्रत्येक कुटुंबाकडून यथाशक्ती दोन हजारांपासून 10 हजारांपेक्षा जास्त लोकवर्गणी घेतली. मात्र, गावपुढार्‍यांनी वसुलीसाठी टोलनाका उभा केला. पुलासाठी 1.25 कोटी रुपये खर्च आल्याचे सरपंच सांगतात. मात्र, फक्त 12 लाख खर्च झाला आहे.
पोमलवाडी येथे उजनी धरणाच्या पाण्यावर भराव टाकून लोकसहभागातून बनवलेला पूल
पुलाचे मोजमाप
लांबी- 2750 फूट
रूंदी- 140 फूट खालील बाजूस
रूंदी- 7 फूट वरील बाजूस
पाण्याच्या अडथळा दूर करण्यासाठी सिमेंटचे पाइप वापरण्यात आल्या.
नळ्यांची संख्या- 176, व्यास -3 फूट, लांबी- 8 फूट
प्रशासनाचे होतेय अक्षम्य दुर्लक्ष
असा पोमलवाडीचा पूल
पोमलवाडीहून केत्तूर नं. 2 येथे पोहोचण्यासाठी उजनी धरणाच्या पाण्यात ग्रामस्थांनी मुरूम, मातीचा भराव टाकून पूल उभारला.