आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरातील गोवऱ्यांची मलेशिया, जर्मनीत निर्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चादर-टॉवेलसाठीप्रसिद्ध असलेल्या सोलापुरातून आता चक्क गोवऱ्यांची निर्यात होत आहे. आकर्षक पॅकिंग आणि उत्तम नियोजनामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित जय संतोषी माता गोशाळेने परदेशात नवे मार्केट उभे केले आहे. अग्निहोत्र विधीसाठी मलेशिया जर्मनीच्या नागरिकांतून गोवऱ्यांची मागणी आहे. गोवऱ्यांची निर्यात करणारी ही पहिलीच गोशाळा म्हणावी लागेल.

शहरातील डाॅक्टर्स आणि समाजसेवकांनी एकत्र येऊन देशी गायीच्या संवर्धनासाठी गोशाळा काढण्याचा निर्णय घेतला.विडी घरकुल परिसरात ३० हजार चौरस फूट जागेत ही गोशाळा उभी राहिली. या ठिकाणी ८५ देशी गायी आहेत. अग्निहोत्र विधीसाठी गोवऱ्यांची आवश्यकता आहे. अग्निहोत्र करणारे भाविक देशासह परदेशातही आहेत. त्यांच्याकडून गोवऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन अक्कलकोट येथील शिवपुरीच्या माध्यमातून ही संकल्पना अस्तित्वात आली. आता प्रतिवर्षी अडीच ते तीन लाख गोवऱ्यांची निर्मिती केली जाते.
जय संतोषी माता गोशाळेतील पॅकिंगमधील गोवऱ्या.
आकर्षक पॅकिंगचा फायदा
तीनवर्षांपूर्वी गोशाळा अस्तित्वात आली. आकर्षक पॅकिंग आणि मार्केटिंगच्या जोरावर अल्पावधीत गोशाळेच्या छोट्याशा उपक्रमाची देशासह परदेशातून दखल घेण्यात आली. देशी गायीच्या संवर्धनाबरोबरच नव्या उद्योगाला चालना मिळाली आहे. गोवऱ्या बनवण्यासाठी शिवपुरीच्या अग्निहोत्र परिवाराने सहकार्य केले. वेगळ्या पॅकिंग लेबलच्या नावाने या गोवऱ्या परदेशात पाठवण्याच्या कामाला चालना दिली.

विधायक कार्याला महत्त्व
देशीगायींचे संवर्धन तसेच गोवऱ्यांच्या निर्यातीबरोबरच संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. संस्थेतर्फे आयोजित सोहळ्यात ९९ जोडप्यांचे सर्वधर्मीय विवाह झाले आहेत. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षिणक साहित्य, आर्थिक मदत देणे, धार्मिक उप्रकमाचे आयोजन केले जाते.

गायीच्या संवर्धनाला रोजगार
आम्ही वेगळ्या पद्धतीने पॅकिंग करून काम केले. त्यास परदेशी बाजारपेठेत महत्त्व मिळाले. या एका गोवरीचे वजन ३५ ग्रॅम एवढे आहे. रोज १५०० गोवऱ्यांचे पॅकिंग होते. २५ गोवऱ्यांचे एक पाकीट तयार होते. देशी गायींच्या संवर्धनाबरोबर रोजगार तसेच नव्या उद्योगाला चालना मिळाली. नागनाथ पोरंडला, जय संतोषी माता गोशाळा

परदेशात मागणी प्रचंड
जय संतोषी माता गोशाळा गेले तीन वर्षं आपल्या गोवऱ्यांचे वेगळ्या पद्धतीने पॅकिंग करून परदेशी बाजारपेठ मिळवली. परदेशात गोवऱ्यांना खूप मागणी आहे. गोपीराव,व्यवस्थापक भार्गव एंटरप्राईजेस, शिवपुरी