आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदनाच करते सृजनांचा आविष्कार - अरुण काकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गो. पु. देशपांडे रंगमंच तनपुरे मठ, पंढरपूर - 1954 पासूनचा रंगायनचा प्रवास आणि 1970 पर्यंत मी अनेक रंगकर्मींसोबत एकदिलाने काम केले. पण त्याच दिलाचे तुकडे झाले ते जीवनातील भावनिक वळण होते. मात्र, त्यातून पुन्हा सृजनाचा प्रवास सुरू झाला. वेदनांच्या काळाला मागे टाकत मी कलेसोबत पुढे निघालो, अन् त्यातून सृजनाचा आविष्कार झाल्याचे मत नाट्यसंमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांनी हौशी कलावंतांशी मुक्त संवाद करताना व्यक्त केले.
नाट्यसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी सकाळी गो. पु. देशपांडे रंगमंचावर मुक्त संवादात काकडे यांच्याशी हौशी कलावंतांनी गप्पा मारल्या. श्री. काकडे यांची प्रवीण तरडे आणि दीपक राज्याध्यक्ष यांनी प्रकट मुलाखत घेतली. यातून काकडेंच्या 60 वर्षांच्या रंगभूमीवरील प्रवासाचा पट उलगडत गेला. या वेळी मुलाखतकार प्रवीण तरडे आणि दीपक राज्याध्यक्ष यांनी हौशी कलावंतांनी ग्रामीण भागातील नाट्यचळवळ, तेथील नाट्यपरिषदेच्या अडचणी, हौशी कलावंतांकडे केले जाणारे दुर्लक्ष, प्रायोगिक रंगभूमीवरचे कलावंत उपेक्षित का आहेत? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रश्नांना श्री. काकडे यांनी अतिशय संयमाने उत्तरे दिली. त्यांनी वर्षभरात ही कामे करणार असल्याचे आश्वासन दिले. कार्यवाह दीपक करंजीकर, मोहन जोशी, लता नार्वेकर, विश्वास मेहेंदळे, प्रदीप मुळे उपस्थित होते.
मतभेद बाजूला ठेवा
नाटक करताना, संघ टिकवताना तात्त्विक मते बाजूला ठेवावीत. वेडच कलाकृती घडवते. नाटकाच्या क्षेत्रात टोकाच्या अहंकाराची लोकं खूप आहेत. अशामुळे त्यांचेही आणि नाटकाचेही नुकसानच होते. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून न बोलता सगळ्या गोष्टी कराव्यात. मतभेद आणि वेडाशिवाय काही घडत नाही. श्री. काकडे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी त्यांनी आठ तास चालणा-या युगान्त, वाडा चिरेबंदी, आणि त्रिरत्नधारा या नाटकांचे उदाहरण दिले.
हे करणार अध्यक्ष
खेडोपाडी नाट्यगृहाचे काम करणार. लेखकांची नवी पिढी तयार करण्यासाठी कार्यशाळा घेणार. कलावंताना सोबत घेऊन काम करणार. मतभेद बाजूला ठेवून नाट्य परिषेदकडून कलावंताची कामे करून घेणार.