आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime Lodged On Nationalist Congress MLAs In The Case Of Beating Village Revenue Chief

सोलापूरात तलाठ्याला मारहाण करणा-या राष्‍ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वाळू उपशाच्या कारणावरून तारापूर (ता. पंढरपूर) येथे मंगळवारी तलाठ्याला
बेदम मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे मोहोळ येथील आमदार रमेश कदम यांच्यावर पंढरपूर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले.

वाळू उपशामुळे मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यात नदीकाठच्या गावातील रस्ते खराब झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रमेश कदम यांनी 'आधी रस्ते मगच वाळू' अशी भूमिका घेतली होती. त्यासाठी गावोगावी फलकही लावले. पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे अवैध वाळू उपसा सुरू होता. कदम मंगळवारी या ठिकाणी गेले. तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना त्यांनी फोन लावला. काही वेळातच पथक पोहोचले. आमदार कदम यांनी पथकातील पंढरपूरचे तलाठी विजय जाधव यांचे म्हणणे न ऐकून घेता त्यांना मारहाण केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तहसीलदारांना धक्काबुकीही केली.त्यावर जिल्हाधिकारी मुंडे यांनी पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक, प्रांताधिकारी संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्याशी चर्चा करून कारवाईचे आदेश दिले होते.