आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - नवीन आरटीओ कार्यालयाजवळ राहणारे सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांच्या घरात चोरी झाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मागील पाच दिवसांपासून ते कामानिमित्त परगावी गेले होते. सकाळी घर फोडल्याची माहिती मिळताच ते पुण्यातून सोलापुरात आले. विजापूर नाका पोलिसांत त्यांनी फिर्याद दिली आहे.
चार चांदीचे ग्लास, हळदी-कुंकवाचा करंडा, पूजा साहित्याची चांदीची भांडी, अन्य साहित्य असा एकूण दीड ते पावणे दोन लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची माहिती श्री. स्वामी यांनी दिली. ते परगावी गेल्यामुळे त्यांच्या घरी झोपण्यासाठी एक नातेवाईक यायचा. सोमवारी त्यांचा मुलगा आजारी असल्याने ते झोपायला आले नाहीत. दरम्यान, सकाळी मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून कपाटातील साहित्य, देवघरातील पूजा साहित्य पळवले.
>हिंदी साहित्य अकादमीचा कार्यक्रम हुकला : मंगळवारी मुंबईत हिंदी साहित्य अकादमीचा कार्यक्रम होता. त्यासाठी ते पुण्यातून मुंबईला जाणार होते. रेल्वेचे आरक्षणही त्यांनी केले होते. सकाळी त्यांना ही माहिती मिळताच घरी आले. या घटनेमुळे ते कार्यक्रमाला जाऊ शकले नाही
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.