सोलापूर- अंत्रोळीकरनगर भाग तीन येथून पायी जाताना शीतल संजय जोशी (रा. सुनंदन कॉम्प्लेक्स, सोलापूर) या शिक्षक महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. ही घटना रविवारी रात्री सव्वाआठच्या सुमाराला घडली.
विजापूर नाका पोलिसात त्यांनी फिर्याद दिली आहे. मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी त्या नातेवाइकांकडे जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी एकाने मंगळसूत्र हिसकावले. चोरांचा शोध सुरू असल्याची माहिती, फौजदार देवेंद्र राठोड यांनी दिली.