आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Divya Marathi, Police, Prison

आरोपीने कोठडीत आत्महत्येचा केला प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ - पोलिस कोठडीतील एका संशयित आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास हा प्रकार घडला. चिरमल्या ऊर्फ बाळू रामचंद्र भोसले (वय 42, रा. जामगाव बुद्रूक) असे त्याचे नाव आहे. गुन्ह्याचा पश्चात्ताप आणि आयुष्याला कंटाळून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद पोलिसात झाली आहे.

कामती पोलिस ठाण्याच्या हद्दीत गतवर्षी दरोडा पडला होता. या गुन्ह्याप्रकरणी परभणी पोलिसांकडून कामती पोलिसांनी त्यास वर्ग करून घेतले होते. कामती येथे कोठडी नसल्याने रात्री दोन वाजता त्यास मोहोळ पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. पहाटे त्याने कोठडीच्या तारा काढल्या. पोटावर, हातावर व गळ्याखाली तारांचे फटके मारून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांना लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचार दाखल केले. त्याला रविवारी न्यायालयात उभे केले असता नऊ मेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.