सोलापूर - विडी घरकुल कोटा नगरात राहणारे सिद्राम चन्नय्या उळेपणमठ (वय 58) यांनी दारूच्या नशेत पेटवून घेतले. उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी अकराच्या सुमाराला घडली. एमआयडीसी पोलिसात याची नोंद आहे.
तसेच याच परिसरात राहत असलेल्या उमेश चंद्रय्या दासरी (वय 42) यांनी घरी पेटवून घेतले. शुक्रवारी ही घटना घडली होती. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसात याची नोंद आहे