आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Robbery Issue At Solapur, Divya Marathi

रोजच होताहेत चोर्‍या, घरफोडी, मंगळसूत्र हिसकावणे, लूटमार; पोलिसांची निष्क्रियता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आयडी अनिर्जनस्थळ गाठून महिलांचे मंगळसूत्र हिसकावणे. अनुदान मिळवून देतो म्हणून अथवा गुंगीचे औषध देऊन किंवा पोलिस, सीसल्याचे सांगत दागिने, पैसे काढून घेणे. घरफोडी, चोरी, मोबाइल चोरीच्या घटनांनी सोलापुरात उच्छाद मांडला आहे. चोरी झाली नाही असा एकही दिवस जात नाही. एक आणि दोन मे रोजी सलग तीन मंगळसूत्रं हिसकावण्याच्या आणि गुंगीचे औषध देऊन अकरा तोळे दागिने पळवण्याच्या घटना समोर आल्या.
चोरांचा सुळसुळाट वाढलेला असताना पोलिस यंत्रणा काय काम करतेय. गुन्हे शाखेचे पथक चोरांच्या मागावर आहे का?, पोलिस ठाण्यातील डीबी पथकांना चोरटे का सापडत नाहीत, हा प्रश्न ज्वलंत बनला आहे.मुख्य रस्त्यावरून दुपारी, सायंकाळी बिनधास्तपणे चोरटे फिरतात, थापा मारून दागिने पळवतात. गुंगीचे औषध देऊन फसवतात, हे कधी थांबणार असा प्रश्न आहे.
महिला म्हणतात..
गुन्हे शाखा व डीबी पथकाचे काम

गुन्हे शाखेच्या पथकाकडे मोठे संख्याबळ आहे. सातही पोलिस ठाण्यात डीबी पथक आहे. त्यांच्याकडून चोरीच्या घटनांचा तपास होत नाही. फौजदार चावडी पोलिसांनी मागील आठवड्यात रॉबरी उघडकीस आणली. गुन्हे शाखा किरकोळ चोरी उघडकीस आणते. पण मंगळसूत्र चोरीचे काय?