आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Suicide, Divya Marathi, Solapur

दीड वर्षाचा संभव झाला पोरका; आईची हत्या, बाबांनी केली आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज - चारित्र्याचा संशय किती भयानक रूप घेऊ शकतो याचा प्रत्यय शुक्रवारी मध्यरात्री माळीनगरात (ता. माळशिरस) आला. झोपलेल्या पत्नीला पतीने आधी दगडाने ठेचून ठार केले. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. माळीनगर हद्दीतील 21 चारी येथे ही घटना घडली. गणेश बाळू जावीर (वय 32) व उमा जावीर (26) अशी दांपत्याची नावे आहेत.


आई-वडिलांपासून वेगळे राहणारा गणेश गवंडीकाम करतो. पत्र्याच्या शेडमध्ये तो पत्नी उमासह राहात होता. शनिवारी सकाळी गणेशचे वडील बाळू जावीर मुलगा व सुनेची त्यांना कसलीही चाहूल लागली नाही. घरात डोकावले असता मुलगा गणेश छताला फासावर लटकत होता. सून रक्ताच्या थारोळ्यात मृ़तावस्थेत आढळून आली. आरडाओरड करून त्यांनी शेजार्‍यांना बोलावले. खबर मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक डॉ. संजयकुमार पाटील व पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे घटनास्थळी दाखल झाले.


गणेशची दोन वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाली होती. हालाखीची परिस्थिती असूनही हे कुटुंब समाधानाने राहायचे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गणेश पत्नीच्या चारित्र्याचा नेहमी संशय घेत होता. दोघांत सतत भांडण व्हायचे, असे गणेशची आई लक्ष्मी यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक साळोखे यांनीही यास दुजोरा दिला. घटनेची अकलूज पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.