आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सोलापूर शहर, जिल्ह्यात गुन्हेगारीस आळा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: पोलिस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांनी सोमवारी, तर पोलिस अधीक्षक राजेश प्रधान यांनी मंगळवारी सोलापुरातील सेवेची दोन वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त या दोन्ही अधिकार्‍यांशी मंगळवारी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात संवाद साधण्यात आला. या दोन्ही अधिकार्‍यांनी सोलापुरातील आपल्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त केले. देशभ्रतार हे जयंती उत्सव कार्यक्रमातील डॉल्बी वाद्याला हद्दपार करून शहरवासीयांच्या कौतुकास पात्र ठरले. पंढरपूर मंदिर सुरक्षेसाठी राजेश प्रधान यांनी विशेष प्रयत्न केले. शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था, नागरिकांच्या संरक्षणाबाबत यापुढेही जागरूकपणे काम करणार असल्याची ग्वाही या दोन्ही ज्येष्ठ अधिकार्‍यांनी दिली. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत.
सेवेची दोन वर्षे । पोलिस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार, पोलिस अधीक्षक राजेश प्रधान यांच्याशी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात संवाद
शहराची व्याप्ती, वाहनांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. असे असले तरी अन्य शहरांच्या तुलनेत सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत आहे. भविष्यात वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल आणि बायपास रस्ते तयार करावे लागतील.
शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी 22 जणांना एमपीडीए कायद्याखाली कारवाई करून कारागृहात डांबले. यात चोर्‍या, घरफोड्या, शासकीय धान्य, गॅस, रॉकेलचा काळाबाजार करणार्‍यांचा समावेश आहे. बेशिस्त पोलिसांवरही निलंबनाची कारवाई केली. कायदा सर्वांसाठी समान आहे, तो पाळलाच पाहिजे, दुसर्‍यांना त्रास होईल असे आपण वागू नये याची जाणीव नागरिकांना करून दिली. दोन गटातील भांडणे मिटवण्यासाठी प्रयत्न केले. उठसूठ गोंधळ घालणार्‍यांवर कलम 307, 395 नुसार गुन्हे दाखल केल्यामुळे हाणामारीचे प्रकार थांबले आहेत.
शहरातील नागरिक शिस्तप्रिय आहेत. ते समजूतदारपणे ऐकून घेतात. आतापर्यंत धुळे, यवतमाळ, बुलढाणा, पुणे या शहरांत काम केले. सोलापुरातील अनुभव चांगला आहे. डॉल्बीवर बंदी आणल्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती आदर वाढला. शहरातील उत्सव, पुण्यतिथी, जयंती, मोर्चे, आंदोलनांमुळे पोलिसांवर ताण येतो. सर्व नागरिकांना उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे. पोलिसांना बंदोबस्त द्यावाच लागतो. पण अन्य शहरात एवढे उत्सव, सण साजरे होत नाहीत. त्यामुळे बंदोबस्ताचा ताण पोलिसांवर अधिक आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेसाठी आठ कोटी रुपयांची पूर्तता शासनाकडून झाली आहे. त्यामुळे आधुनिक सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. त्याशिवाय सर्व पोलिस वाहनांवर जीपीएस यंत्रणा, जिल्ह्यातील 22 पोलिस ठाणे अधीक्षक कार्यालयाशी सीसीटीव्हीच्या माध्यमाने जोडली. यामुळे कामात सुसूत्रता आली.
गेल्या दोन वर्षांत ग्रामपंचायत, साखर कारखाने शांततेत पार पडली. माढा तालुक्यातील खूनप्रकरणाचा तपास सक्षमपणे केला. कुठलाही राजकीय दबाव आपल्यावर आला नाही. तंटामुक्त मोहीम यशस्वीपणे राबविली. महत्त्वाची बाब म्हणजे शासनाचा सर्वाधिक निधी (बक्षीस) आठ कोटी रुपये सोलापूरला मिळाला, ही गौरवास्पद बाब आहे.
विजापूर, पुणे, हैदराबाद या तीन महामार्गांचे रुंदीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होईल. पण, वाहनांच्या नियंत्रणावर भविष्यात लक्ष ठेवण्याची गरज आहे. मुंबई-विशाखापट्टणम या महामार्गाचे मुख्य केंद्र सोलापूर आहे. त्यामुळे आपल्या परिसरात अपघात होतात. पहाटेच्या वेळी वाहनचालक झोपेत असतात. अशावेळीच अपघातांचा धोका होतो. त्यामुळे वाहन थांबवून चालकांना झोप घेता यावी, यासाठी टेंभुर्णी येथील काही ढाबे रात्रीही सुरू ठेवण्याची परवानगी दिली.
सीमावर्ती भागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी विजापूर, गुलबर्गा पोलिस अधीक्षकांशी चर्चा करण्यात आली. सीमावर्ती भाग सोलापूरला जवळ असल्यामुळे गुन्हेगारांची ये-जा असते. अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. चोर्‍या, घरफोड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. दरोडेही थांबले आहेत. अनेक मोठय़ा गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला आहे.