आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इंद्रायणी’स आला पुन्हा ‘पूर’, तोबा गर्दीने केली माय लेकराची ताटातूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रविवारी इंद्रायणी एक्स्प्रेसला परीक्षार्थींमुळे प्रचंड गर्दी होती. ज्यांना ज्या कोचमध्ये जागा मिळत होती ते त्या कोचमध्ये चढत होते. दिवाळीच्या सुटीसाठी पुण्याहून सोलापूरला आलेल्या माय-लेकरांची गर्दीमुळे रेल्वे स्थानकावर ताटातूट झाली. जागा मिळविण्यासाठी आई डब्यात पहिल्यांदा चढली. गर्दीच्या रेट्यापुढे तिचे काहीच चालेना.
गर्दी इतकी होती की तिलादेखील बाहेर येता आले नाही. आपली तीन मुले फलाटावरच राहिली. त्यांचे दैव बलवत्तर म्हणून मुलांचे आजोबा बशीर पठाण हे फलाटावर उपस्थित होते. त्यांनी आपली तीनही नातवंडे साहिल पठाण, सोहेल पठाण मुस्कान पठाण यांना आपल्याजवळ घेतले. गाडी निघाल्यानंतर आईपासून वेगळे झालेल्या मुलांनी स्थानकावर हंबरडा फोडला. आजोबांनी आपल्या जवळच्या मोबाइलवरून मुलांना आईशी बोलणे करून दिले आणि संध्याकाळच्या चेन्नई मेलने मुलांना आपल्या नातलगासह पुण्याला धाडले.

२१ परीक्षा केंद्रांवर पार पडली परीक्षा
रेल्वेच्याग्रुप डी मधील ट्रॅकमन, पॉइंट्समन, खलाशी सफाईवाला आदी पदांसाठी सोलापुरातील २१ केंद्रांवर परीक्षा झाली. २० हजार ११२ जणांची नोंदणी होती. त्यापैकी केवळ हजार ४४७ हजर होते. १६ हजार ६६५ जणांनी परीक्षेला दांडी मारली. केंद्रावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक जॉन थॉमस, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक के. मधुसूदन, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक नरपत सिंह, वरिष्ठ विभागीय वािणज्य व्यवस्थापक नर्मदेश्वर झा, वरिष्ठ विभागीय कामिक अधिकारी रामचंद्र बरकडे आदी अधिकारी उपस्थित होते.
रेल्वेने लढवली शक्कल
मागच्यारविवारी पार पडलेल्या परीक्षेवेळी अनेक परीक्षार्थींनी रेल्वेचे तिकीट काढताच आरक्षित डब्यात गर्दी केली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या वेळी स्थानकावरील गेटवर तिकीट निरीक्षकांना उभे केले होते. परीक्षार्थींचे तिकीट पाहूनच त्यांना आत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे चालू तिकीट विक्री मोठ्या प्रमाणात वाढली. जे विनातिकीट आत प्रवेश मिळविले त्यांना विनातकीट प्रवेश केल्याने दंडात्मक कारवाई केली गेली. यामुळे गर्दी काही प्रमाणात कमी झाली. स्थानकावर तिकीट विक्रीच्या सर्व खिडक्या चालू ठेवण्यात आल्या होत्या.