आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cultural News In Marathi, Interview Of Shilpa Shirodkar, Divya Marathi

निर्मिती क्षेत्रात महिलांनी उतरावे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी नायिका बोल्ड होताहेत.

बदलत्या काळानुसार निर्माती म्हणून स्त्रियांनीही पुढे येण्याची गरज आहे. स्त्रियांची विचार करण्याची पद्धती आणि मुळातच त्यांचे विचार जरा वेगळ्या धाटणीचे असतात. त्यामुळे चित्रपटालाही नवीन विचार, विषय मिळू शकतात. त्याचा एक वेगळा प्रभाव पडतो, असा संवाद अभिनेत्री, निर्माती शिल्पा शिरोडकर हिने ‘सौ. शशी देवधर’च्या निमित्ताने साधला.

1सौ. शशी देवधर’निमित्त तुमची मुलगी चित्रपटात पदार्पण करतेय..
हो, माझी मुलगी अनुष्का रणजित पडद्यावर प्रथमच दिसणार आहे. अर्थात या चित्रपटात तिची अत्यंत छोटी, पण तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. तिला ‘सौ. शशी..’मधली भूमिका आवडली म्हणून तिने स्वीकारली आणि तिने त्या भूमिकेला उत्तम न्यायही दिला आहे.
2आजी मीनाक्षी शिरोडकरांचा वारसा तुम्ही जपता आहात..
खरंय. मी, माझी बहीण नम्रता आणि आता माझी मुलगी इथपर्यंत अभिनयाचा वारसा आलाय खरा. माझ्या आजीने म्हणजे मीनाक्षी शिरोडकरांनी 1932 मध्ये ‘ब्रrाचारी’ चित्रपटात काम केलं होतं. या क्षेत्रात निर्मितीक्षम अशी अनेक अंगे आहेत, ती आत्मसात करायला मी शिकले .
3मराठी नायिका आता बोल्ड होताहेत..
माझ्या आजीने तिच्या काळात पडद्यावर वावरताना एकप्रकारे धाडसच केलं होतं. ब्रrाचारी चित्रपटासाठी तिने अत्यंत धाडसी मार्ग पत्करला होता जो सर्वर्शुतच आहे. आता समाजही बदलत गेलाय. नायिका बोल्ड होणं स्वाभाविक आहे.
4मुख्य भूमिकेसाठी सईची निवड का केली?
सई ताम्हणकर आतापर्यंत बोल्ड लूक आणि ग्लॅमरस अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. ‘सौ. शशी.’मधील अत्यंत सोज्वळ लूक असलेल्या मुख्य भूमिकेसाठी तिची निवड करण्यात मला कसलीही शंका वाटली नाही, ना चित्रपट झाल्यानंतर तिची निवड का केली असा प्रश्न मला पडला नाही.
5निर्माती म्हणून महिला कलाकार पुढे येताहेत..
मी या चित्रपटाची निर्माती असले तरी चित्रपटाचा बव्हंशी भाग माझे पती अपरेश यांनी सांभाळला आहे. तरीदेखील बदलत्या काळानुसार निर्माती म्हणून स्त्री कलाकारांनी पुढे येणं ही आजची गरज आहे.
6मराठी सिनेमात झालेले बदल तुम्हाला कसे वाटतात?
मराठी सिनेमा चांगल्या दिशेने आता प्रवास करतो आहे. त्यासाठी प्रेक्षकांचा बदलता दृष्टिकोनही कारणीभूत आहे. प्रेक्षकांना जवळचे वाटणारे चित्रपट लागतात त्यामुळे दिग्दर्शक, निर्माते आपल्या चित्रपटाचा साचा व्यापक करायला लागले आहेत. त्यामुळे मराठी सिनेमा हा व्यापक होतो आहे.