आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cultural News In Marathi, State Level Young Talent Program Started, Divya Marathi

राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवाचा थाटात समारोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक आयोजित युवा प्रतिभा महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे झाले. लोककला, शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणाबरोबरच गायिका आर्या आंबेकर या महोत्सवात आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली.

येथील पंढरपूर अर्बन को ऑप. बँकेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवाचा शुक्रवारी समारोप झाला. बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक व सारेगमप फेम गायिका आर्या आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सुगम गीत, समूह गीत, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्यावर चार दिवस तरुणाईने पंढरीत एकच ताल धरला होता.

सारेगमप फेम गायिका आर्या आंबेकरची विशेष उपस्थिती

तरुणाईच्या कलेला व्यासपीठ मिळावे व नवनवीन कलाकार पंढरी नगरीत तयार व्हावेत या उद्देशाने युवा प्रतिभा महोत्सव आयोजित केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी दिली.
गायिका शकुंतला जाधव, विजय सरतापे, संपदा मराठे, दिलीप टोमके, मनोज वर्दम, पारूल परमार, लक्ष्मी बडवे हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. आर्या आंबेकर हिनेही मनोगत व्यक्त केले. यावेळी पंढरपूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष उदय उत्पात, संचालक सतीश पुरंदरे, रा. पां. काटेकर, पु. प. खडके, मुन्नागिरी गोसावी, मेधा दाते, रेखा अभंगराव, गोपाळ बडवे, रामभाऊ माळी, गजानन भोसले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण डिंगरे, मुख्य व्यवस्थापक उमेश विरधे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता एस. पी. कुलकर्णी, नंदकुमार कुलकर्णी, विनोद शेंडगे, अतुल अंमळनेरकर, वैभव जोशी, संदीप पिटके, विलास जोशी, अमित वाडेकर तसेच पंढरपूर अर्बन बँक व कर्मयोगी कॉलेजचे कर्मचारी, लोकमान्य मंडळ आदींनी पर्शिम घेतले.