आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात ‘अरोही 13’ उत्साहात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉर्मस एमबीए विभागातर्फे येथील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात ‘अरोही 2013’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाला.

अरोही अंतर्गत झालेल्या डान्स स्पध्रेत जागरण-गोंधळ नृत्य सादरीकरण केलेल्या यशर्शी मिरजे यांचा संघ प्रथम आला. विनज आणि संघाने सादर केलेले समूह नृत्य दुसरे, तर वर्षा बोमड्याल संघ तृतीय आला. तीन दिवस चाललेल्या या कल्चरल प्रोग्रॅममध्ये अँड मॅड शो, एकल नृत्य, समूह नृत्य, फॅशन शो आदी विविध उपक्रमांचा समावेश होता. सर्व कार्यक्रमांना उपस्थितांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. काही सादरीकरण खास ठरले.

प्राचार्य डॉ. बी. एन. बारकूल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून दीपाली लिमये, र्शद्धा बीडकर, विभागप्रमुख बी. व्ही. डोळस, प्रा. विलास बांलगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.