आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cultural, Religious Program Issue At Sidheshwar Temple

सिद्धेश्वर मंदिरामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- श्री सिद्धेश्वर देवस्थान श्रावणमास उत्सव समितीतर्फे श्रावणमासानिमित्त 27 जुलै ते 25 ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोगडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

सांस्कृतिक कार्यक्रम
श्रावणमास उत्सवानिमित्त दरवर्षी प्रत्येक श्रावण सोमवारी अनेक भजनी मंडळे आपली सेवा मंदिराच्या सभामंडपात रूजू करत असतात. त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान, श्रावणमास उत्सव समिती, सोलापूर यांच्यातर्फे भजन स्पर्धांचे आयोजन 25 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात आले आहे. या स्पध्रेशिवाय प्रत्येक श्रावण सोमवारी शहरातील अनेक भजनी मंडळांना श्रींसमोर आपली सेवा रूजू करायची असते. अशा मंडळांच्या वेळेचे योग्य असे नियोजन करता यावे, यासाठी पूर्वनोंदणी करावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
सुरक्षा, सोयी आणि प्रसाद
मंदिर परिसरात एकूण 19 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय खास सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थी व श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनींची स्वयंसेवक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सोमवारी डिजिटल स्क्रिनद्वारे श्रींच्या दश्रनाची सोय केली आहे. प्रत्येक सोमवारी इन सोलापूर या वृत्तवाहिनीद्वारे योगसमाधी पूजेचे व गाभार्‍यातील पूजेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दररोज सकाळी योगसमाधी पूजेनंतर प्रसाद म्हणून बुंदी, खोबर्‍याची बर्फी, मसाला भात, शिरा, लापसी वगैरे वाटप करण्यात येणार आहे.

फुलांची सजावट
पहिला सोमवार गर्भ मंदिरातील पूजा देशमुख घराण्याकडे, पहिला सोमवार-बापूसाहेब सिद्रामप्पा करजगीकर, दुसरा सोमवार-बसलिंगप्पा जम्मा व सिद्धाराम चिट्टे, तिसरा सोमवार-शिवानंद बसवणप्पा कोनापुरे, चौथा सोमवार-भारत तेलसंग, पाचवा सोमवार-गणपती म्हाळप्पा घेरडीकर हे करणार आहेत.

धार्मिक कार्यक्रम
दररोज पहाटे 5 वाजता काकडा आरती, सकाळी 8.30 वाजता श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगसमाधीची पूजा, सकाळी 10.30 व दुपारी 4 वाजता मुख्य मंदिरात आरती, रात्री 10 वाजता शेजारती, तसेच दररोज पहाटे 4 वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिरातून कावड मिरवणूक श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 शिवलिंगांच्या पूजेकरिता निघेल.
भाविकांना देण्यात आल्या सूचना
बेल व फुले वगैरे जर येण्या-जाण्याच्या मार्गावर पडली असतील तर बाजूला ठेवावीत, नारळ फोडलेली कवचेही बाजूच्या कचरापेटीत टाकावीत, महिला भक्तांनी कमी दागिने घालून दश्रनास यावे, मंदिर परिसरात अनोळखी अथवा संशयित व्यक्ती आढळल्यास किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळल्यास त्याची सूचना पोलिसांना द्यावी आदी सूचना देण्यात आल्या. या वेळी बाबूराव नष्टे, मल्लिकार्जुन बाकळे, नंदकुमार मुस्तारे, सोमशेखर देशमुख, गंगाधर कुमठेकर उपस्थित होते.