आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘डीएड’ कॉलेजचा अहवाल मार्चनंतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्यभरातील डी. एड. कॉलेजच्या तपासणीचा अहवाल अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे मार्च महिन्यानंतर हा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्‍ट्र राज्य शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. एन. के. जरग यांनी दिली.


डी. एड. महाविद्यालयांचे फुटलेले पेव आणि घसरलेला शैक्षणिक दर्जा या पार्श्वभूमीवर संपूर्ण डी. एड. महाविद्यालयाची जानेवारीत तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल 16 जानेवारीदरम्यान एमएससीईआरटीला सादर करण्यात येणार होता. तसेच तो 28 फेब्रुवारीपर्यंत सरकारकडे सुपूर्द करून निकालही दिला जाणार होता. परंतु अद्याप तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. तपासणीच्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर केला जाणार आहे. काही कॉलेजांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यास सुरुवात केली जाणार असल्याचेही जरग यांनी सांगितले.