आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दादा महाराज मनमाडकर यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - येथील वारकरी सांप्रदायाचे तत्वचिंतक डॉ. दादामहाराज मनमाडकर (वय 76) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी (दि. 3) सकाळी 9 वाजता त्यांच्या येथील राहत्या घरापासून निघणार आहे. येथील प्रसिद्ध मातोर्शी (वै.) गयाबाई महाराज मनमाडकर मठाचे ते प्रमुख होते. मनमाडकर महाराज गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. शुक्रवारी दुपारी उपचारासाठी त्यांना पुणे येथे नेत असताना सायंकाळी 4 वाजून 56 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाठीमागे दोन पुतणे, एक पुतणी असा परिवार आहे.

दादामहाराज मनमाडकर हे 1963 मध्ये पुणे येथील स. प. महाविद्यालयातून बी. ए. पूर्ण झाले. त्यानंतर संपूर्ण तत्त्वज्ञान विषय घेऊन त्यांनी पुणे विद्यापीठातून एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ‘वारकरी सांप्रदाय तत्त्वज्ञान व सद्य:कालीन 'औचित्य’ या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठात अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला होता. हा प्रबंध भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेमार्फत र्जमनीतील हायडेलबर्ग विद्यापीठात संशोधनात्मक अभ्यासासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणून पाठवण्यात आला होता. हा ग्रंथ महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे स्वरूप, इतिहास, तत्त्वज्ञान विषद करणारा असा आहे.

दादामहाराज मनमाडकरांना मिळालेले सन्मान :- 1978 मध्ये पुणे विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी बहाल. 1983 संतपीठ समिती महाराष्ट्र शासन नियुक्त सदस्य. 1991 मध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार व ताम्रपटावरील सन्मानपत्र. 1997 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्ञानदेव पुरस्कार. 1996 ते 1998 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सन्मान्य सहभाग.महाराष्ट्र शासनातर्फे 2008 पासून सुरू करण्यात आलेल्या ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे ते पहिले मानकरी ठरले होते