आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dalai Lama Invite Solapurs Penter, Divya Marathi

सोलापूरच्या चित्रकाराला तिबेटच्या धर्मगुरूंचे निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरचे चित्रकार जितेश मोरे यांनी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर काढलेल्या तैलचित्रांनी तिबेटचे बौद्ध धर्मगुरू प्रभावित झाले आहे. पुण्याच्या महाकश्यप महाविहारचे प्रमुख भदन्त राजरत्न यांच्यामार्फत तिबेटच्या धर्मगुरूंनी जितेश मोरे यांना निमंत्रण दिले आहे. हा निमंत्रणामुळे मोरे यांना खूप आनंद तर झाला आहे. शिवाय तिबेटच्या धर्मगुरूंकडून निमंत्रण येणे, हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

फॉरेस्ट बुद्धविहार येथे मोरे यांनी बुद्धांचे तैलचित्र तयार करून लावले होते. ते लोकांना इतके भावले की, त्यांना पुण्याच्या महाकश्यप महाविहार येथे बुद्धांचे तैलचित्र काढण्यास बोलवले. तिथे त्यांनी भवचक्र (प्रदित्यसमुपत्पाद) बोधिसत्व (दीर्घ आयुष्य) ही दोन चित्रे तयार केली. ही चित्रे नालंदा विद्यापीठाच्या धर्तीवर काढण्यात आली होती. या चित्राने प्रभावित होऊन त्यांना तिबेटला येण्याचे निमंत्रण आले. बुद्धांच्या जीवनावर चित्रे रेखाटण्यासाठी तिबेटला जाणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.