आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्‍ये डफरीन ते रंगभवन रस्ता झाला ‘जॅम’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ग्रामदैवत र्शी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदान आणि परिसरात भरत असलेल्या गड्डा यात्रेची खरी मजा आता सुरू झाली आहे. परराज्यांतून आलेले विविध प्रकारचे पाळणे, खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटण्यासाठी शहर, जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील नागरिकांची वर्दळ वाढताना दिसत आहे.
लक्ष्मी भाजी मंडईजवळ लाखेच्या बांगड्यांची दुकाने, गाडगे मडक्यांच्या राशीही रस्त्यावर मांडलेल्या दिसतात. यंदाच्या वर्षी चायना लाइटिंगने सजवलेले विविध प्रकारचे फ्लॉवर पॉट, खेळणी, लहानांची मनगटी घड्याळे यांचीही विक्री होताना दिसत आहे. मुख्य आकर्षण असणारे टोलेजंग पाळणे. आनंदमेळ्यात एक आणि मैदान परिसरात मोठे पाळणे, मेरी गो राऊंड, टोराटोरा, ड्रॅगनट्रेन अशी पाळण्यांची रेलचेल आहे. लहानांसाठी बाबागाडी, लहान पाळणे, घोड्यांची रपेट व रिमोटच्या कारही आहेत. तसेच यंदा रिपल हॉल समोरील परिसरात सात ते आठ रिंगा टाकून वस्तू जिंका अशा स्वरूपातील दहा ते बारा दुकाने आहेत. 10 रुपयांना तीन रिंगा असून ती रिंग ज्या वस्तूवर पडेल ती संबंधितास बक्षीस रूपात देण्यात येते.

अशी थाटली दुकाने

पंचकट्टय़ापासून होममैदान, सिद्धेश्वर मंदिर, जिल्हा परिषद परिसर येथे खेळण्या, चपला, फॅन्सी कपडे, गृहोपयोगी साहित्य, एअरगनची दुकाने, जादूचे प्रयोग, मौत का कुव्वाँ, बटाटे वडा, सुगंधी दूध यांची दुकाने सुरू झाली आहेत. तसेच, नगरचा प्रसिद्ध रामप्रसाद व लक्ष्मणप्रसाद चिवडा तर लांबोटीचा मक्याचा चिवडाही विक्रीस आलेला आहे. खवय्यांसाठी वडा, पावभाजी आणि खमंग पापडांची दुकानेही आहेत.

गड्डा यात्रेतील आनंदमेळ्यात अवाढव्य डायनासॉर्सचे खास दालन रॅम्बो इंटरनॅशनलने उभारले आहे. मुख्य प्रबंधक के. एस. पुष्करण यांनी सांगितले की, येथे नऊ प्रकारचे हालचाल करणारे डायनासॉर्स, त्यांचे आवाज, अंडी यांच्या प्रतिकृती आहेत. त्यातील 25 फूट उंचीच्या एका डायनासॉरचे हे छायाचित्र.

डफरीन चौक ते रंगभवन मार्गावर बुधवारी सायंकाळी व रात्री वाहतुकीची कोंडी झाली होत होती. शोभेचे दारूकाम पाहण्यासाठी आलेले नागरिक हरिभाई देवकरण शाळेजवळ व परिसरात दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने पार्क केल्यामुळे हा प्रकार सुरू होता. त्यात भर म्हणून अँपेरिक्षा, रिक्षा चालक कोठेही थांबून प्रवासी घेत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वारंवार होत होती. दरम्यान, सहाय्यक पोलिस आयुक्त मोरेश्वर आत्राम यांना वाहतुकीच्या कोंडीची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वाहतूक नियोजनासाठी सूचना देऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

26 जानेवारीपर्यंत गड्डा यात्रा असते. सायंकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत नागरिकांची मोठी गर्दी होते. रिक्षा, अँपेरिक्षा दोन्ही बाजूला थांबल्यामुळे वाहतूक ‘जॅम’ होते. अनेक वर्षांपासून ही समस्या यात्रा कालावधीत भेडसावत आहे. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत रिक्षांना रंगभवन व डफरीन चौकातच थांबा द्यावा. अन्यथा डफरीन चौक ते जुना एप्लॉयमेंट चौक, सात रस्ता मार्गावरून ये-जा करण्यास मुभा द्यावी. अथवा डफरीन ते नूमवी शाळेच्या बोळातून रिक्षा ये-जा करू शकतील