आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाने नव्हे; सोनेच लुटले..! 300 चारचाकी, 500 दुचाकी दसरा मुहूर्तावर आल्या रस्त्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरकरांनी सोन्याची मोठी खरेदी केली. सायंकाळी सराफ बाजारातील सुवर्णपेढ्या उजळून गेल्या होत्या. ग्राहकांनी दालने फुलून गेली होती.

19 सप्टेंबरला 26 हजार 496 रुपये 10 ग्रॅम विकले गेलेल्या सोन्याच्या दरात हजार रुपयांची वाढ झाली. तरीही सराफ व्यापा-यांनी दसरा खरेदीची धूम अनुभवली. गेल्या वर्षी दसऱ्यालाच 29 हजार 800 रुपये दर होता. तुलनेत यंदा दोन हजार रुपयांनी सोन्याचे दर उतरलेले होते.
सोन्याच्या दरात घसरण होतच राहणार अशी भाकिते व्यापारपेठांमधून वर्तवली जात होती. परंतु आंतरराष्ट्रीय चलन बाजारात २० सप्टेंबरनंतर डॉलरचा दर वाढत गेला. त्यामुळे सोन्याच्या दराचा आलेखही वाढताच राहिला. दसऱ्याला २७ हजार रुपयांवर स्थिरावेल, हा व्यापाऱ्यांचा अंदाज खरा ठरला. दसऱ्याच्या मुहूर्तावर गूंजभर का होईना सोने घ्यावे, अशी एक भावना असते. त्यापोटीच दस-याला ग्राहकवर्ग सराफ बाजारात येतो. यंदा शहरी ग्राहकांपेक्षा ग्रामीण ग्राहकांची संख्या मोठी असल्याचे सराफ व्यापारी म्हणाले.

ग्रामीणमधून प्रतिसाद
मारुतीसुझुकी कंपनीच्या १७० गाड्या दसऱ्याच्या मुहूर्तावर वितरित केल्या. यंदा ग्रामीण भागातील ग्राहकांनी चांगली खरेदी केली. दस-याची खरेदी अतिशय समाधानकारक झाली.” शिवप्रकाशचव्हाण, संचालक,चव्हाण मोटर्स

मालवाहतूकगाड्या
टाटाकंपनीच्या मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची नोंदणी दस-याच्या मुहूर्तावर झाली. ५० वाहनांच्या चाव्या ग्राहकांच्या हाती दिल्या. चारचाकी वाहनांचीही चांगल्या प्रकारे खरेदी झाली.” चंद्रशेखरईराबत्ती, व्यवस्थापक,स्टर्लिंग मोटर्स
चांगली झाली खरेदी
सोन्याच्यादरात वाढ झाली तरी तुलनेत तो कमीच होता. परंतु दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने घेणारा ग्राहक दराची तफावत पाहत नाही. मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी तो आलेला असतो. अशा ग्राहकांकडून अपेक्षित अशी सोन्याची खरेदी झाली.”बापूसाहेबकरजगीकर, सराफव्यापारी