आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरएसएस समता दलाचे संचलन, ध्वजारोहण, धम्म संस्कार सोहळाही रंगला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दस-याच्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संचलन केले. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी धम्म संस्कार सोहळा केला. रा.स्व. संघातर्फे शहरात तीन ठिकाणी संचलन केले.
मोदी पोलिस चौकी परिसर, लक्ष्मीनारायण टॉकीज परिसर, भवानी पेठ परिसर येथे संचलन झाले. मोदी पोलिस चौकी परिसरातील संचलनात सुमारे 400 जण होते. शहर संघचालक राजेश काटवे, किरण सुतार, प्रदीपसिंह रजपूत आदी अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळी घालून फटाके उडवून स्वागत करण्यात आले. लक्ष्मीनारायण टॉकीज परिसरातील संचलनास जिल्हा संघचालक दामोदर दरगड आदी पदाधिकारी उपस्थित होते. भवानी पेठेतील संचलनात जिल्हा कार्यवाह रंगनाथ बंग, शहर कार्यवाह व्यंकटेश कैंची, डॉ. उदय वैद्य आदी सहभागी होते.
धम्म संस्कार सोहळा
समतासैनिक दलाच्या वतीने नॉर्थकोट मैदान येथे धम्म संस्कार सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. संचलन झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. यानंतर मोटारसायकल धम्मसंदेश रॅली काढण्यात आली. सायंकाळी सामूहिक बुध्दवंदना, समता सैनिक दलांचे निरीक्षण संचलन करून भीमगीत सादर करण्यात आले. भीमगीतांनी येथील वातावरण भीममय झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलींनी उत्कृष्ठ असे नृत्य सादर केले. यावेळी महापौर सुशिला आबुटे आणि एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोलापुरातील असंख्य भीमप्रेमी उपस्थित होते.