आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर वर्षांत एकदाच संधी; 11.12.13 ला मुहूर्त नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सरत्या वर्षातील अविस्मरणीय ठरणारी तारीख 11.12.13 बुधवारी येत आहे. परंतु पंचांगात हा दिवस शुभ नसल्याने मुहूर्त नाहीत. त्यामुळे अविस्मरणीय ठरणारा विवाह किंवा इतर शुभकार्ये या दिवशी नाहीत. हजार वर्षांनी येणारा हा योग साजरा करण्यासासाठी संगीतक्षेत्रातील मान्यवर पुढे येत आहेत. या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 365 दिवसांतील हा दिवस 345 वा आहे. म्हणजेच ‘3-4-5’ असाही योग जुळून येतो आहे. पंचांग अथवा खगोलीय अंगाने या दिवशी फार काही घडामोडी नाहीत. केवळ आकड्यांचा हा योगायोग असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. आपल्या एखाद्या कृतीने हा दिवस आयुष्यभर स्मरणात राहावा, असे खूप लोकांना वाटते. परंतु त्यादृष्टीने योग जुळून यावा. त्यासाठी कृत्रिम प्रयत्न नकोत, असे गरोदर मातांचे मत आहे. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञांकडेही या दिवशी प्रसूतिसंबंधी विचारणा नाही. तरीही त्या दिवशी जन्माला येणार्‍या मुलाचा वाढदिवस सार्‍यांनाच लक्षात राहील, असाच आहे.
मक असणारे मूल जन्माला येईल
11.12.13 या तारखेला जन्माला येणारे मूल कलावंत आणि राजकारणी होतील. त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा असेल. स्वभावाने हळवे आणि कर्तव्याने कठोर असल्याने कामात धमक असणार आहे.’’ प्रशांत महिंद्रकर, अंकशास्त्र अभ्यासक
प्रिंटलिपी प्रशिक्षण
11.12.13 ही तारीख विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहण्यासाठी प्रिंटलिपीचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले. डफरीन चौकातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत सायंकाळी सहाला हा कार्यक्रम होईल. इंग्रजी अथवा मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी पेपर सोडवताना प्रिंटलिपीतून लिहिणे गरजेचे आहे.
- अभिजित भडंगे, हस्ताक्षर प्रशिक्षक
केवळ योगायोग
हिंदू पंचांगात या तारखेला कुठलाही मुहूर्त नाही आणि त्याला फारसे महत्त्वही दिलेले नाही. ही तारीख म्हणजे आकड्यांचा केवळ योगायोग आहे. विवाह मुहूर्त असता तर विवाहांचा धूमधडाकाच झाला असता.
- पंडित वेणुगोपाल जिल्ला, पुरोहित
12 गाण्यांची मैफल
अशा तारखा अविस्मरणीय असतात. त्या दिवशी काही तरी करावे, या इच्छेतून 12 हिंदी, मराठी गाण्यांची मैफल आयोजित केली आहे. सेवासदन प्रशालेत सायंकाळी साडेसहाला हा कार्यक्रम होईल.
- प्रशांत देशपांडे, गायक व संगीतकार
दाम्पत्यं विचारतात..
अविस्मरणीय ठरणार्‍या तारखांना बाळ जन्माला यावे, अशी अनेक दाम्पत्यांची इच्छा असते. गरोदरपणाचा काळ पूर्ण झालेल्या मातेला असे वाटणे साहजिकच आहे. 11.12.13 चेही असेच आकर्षण दिसते; परंतु नैसर्गिक पद्धतीने प्रसूत होणेच चांगले. त्याच दृष्टीने आमचे प्रयत्न असतात.
- डॉ. अंजली चिटणीस, स्त्रीरोगतज्ज्ञ