आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीसीसी बँक निवडणूक, तयारी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर नसला तरी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी २५ मे ते २३ जून या कालावधीत प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी संस्थाकडून ठराव घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रारूप-अंतिम मतदारयादीची प्रक्रिया निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया सप्टेंबर २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संस्थेचा प्रतिनिधी नियुक्त करण्याचा ठराव संचालक मंडळाने केलेला असावा. संस्था वा सभासद थकबाकीदार असेल, किंवा संस्थेकडून थकबाकी असलेल्या संचालकाचा ठराव दिल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. यामुळे संस्थेने ठराव पाठवताना थकबाकीदार नसलेल्या सभासदाचा ठराव पाठवावा, अशा सूचना सहकारी निवडणूक अधिकारी यांनी केल्या आहेत.
१९ संचालक ,४०५२ संस्था
जिल्हामध्यवर्ती बँकेचे १९ संचालक आहेत. यामध्ये वि.का.से.सोसायटी गटातून ११ संचालक, महिला गटातून संचालक, अनुसूचित जाती-जमाती गट १, इतर मागासवर्गीय विमुक्त जाती-जमाती वा विशेष मागासवर्गातील आणि कृषी पणन संस्था शेती माल प्रक्रिया संस्था १, इतर शेती संस्था बँक पतसंस्था गटातून असे एकूण १९ संचालक निवडून द्यायचे आहेत. हे १९ संचालक निवडून देण्यासाठी हजार ५२ संस्था पात्र आहेत. हे संचालक निवडून देण्यासाठी या संस्थेकडून प्रतिनिधी नियुक्त केल्याचे ठराव मागविण्यात येणार आहेत.
मतदार यादीनंतर निवडणूक होईल जाहीर
अधिकृत संस्थेच्या सभासदांकडून नियुक्त प्रतिनिधीचा ठराव घेण्यात यावा. ही प्रक्रिया २५ मे ते २३ जून या कालाधीत राबविण्यात यावी. ही यादी प्राप्त झाल्यानंतर यादीचे जाहीर प्रसिद्धीकरण करावे. यानंतर त्यावर हरकती घेणे त्याची सुनावणी घेऊन निर्णय घेणे. यानंतर मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे. अंतिम मतदार यादी प्रसिद्धी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी यामध्ये १० दिवसांचे अंतर ठेवावे.
ही घ्यावी लागणार दक्षता
संस्थेच्या वतीने प्रतिनिधी पाठवताना नियमानुसार सभा बोलावण्यात यावी, संस्थेचे सभासदत्व असले पाहिजे, नियुक्त प्रतिनिधीचे संपूर्ण नाव, पत्ता, स्त्री/पुरुष, वय आवश्यक बाबी नमूद असाव्यात, संमत केलेल्या ठरावावर संस्थेचे अध्यक्ष चिटणीस यांच्या सह्या आणि ठरावाच्या नकलेवर संस्थेचा गोल शिक्का आवश्यक, संस्थेचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक दिनांक या गोष्टी ठराव देताना असणे आवश्यक असणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...