आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Death Akshata Family Help To Zp Women Welfare Department Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत अक्षताच्या कुटुंबीयांना मिळणार पगारातून मदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे जेऊर (ता. अक्कलकोट) येथील अंगणवाडीत शिकणारी अंकित तेली (वय पाच) ही विद्यार्थिनी गेल्या आठवड्यात मृत पावली होती. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्ह्यातील 16 बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी एक दिवसाचे मानधन तेली कुटुंबीयांना मदत देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची बैठक शुक्रवारी सभापती जयमाला गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गेल्या आठवड्यात जेऊर येथील ग्रामपंचायतीच्या गाळ्यात भरणार्‍या अंगणवाडीतील विद्यार्थिनी ट्रॅक्टरची धडक बसल्याने मृत पावली होती. अंगणवाडीतील बालकाचा अपघात किंवा त्यामध्ये मृत्यू झाल्यास त्या कुटुंबीयांना मदतीची कोणतीही योजना नाही. त्यामुळे अधिकार्‍यांनी स्वत: त्यांचे एक दिवसाचे वेतन त्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व उत्तर सोलापूर तालुक्यातील अंगणवाडीच्या बालकांवर कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील एम. एम. पटेल फाउंडेशन ट्रस्टतर्फे मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येत आहेत. पटेल फाउंडेशनने सामाजिक दायित्वाच्या उद्देशाने बालकांवर मोफत उपचारासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी डॉ. माधवी रायते यांनी विशेष प्रयत्न केले.
अक्कलकोट तालुक्यातील 307 बालकांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये सात बालकांना उपचारासाठी दाखल केले. एकाच्या मेंदूमध्ये असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, असे सभापती गायकवाड यांनी सांगितले. जिल्ह्यात प्रामुख्याने करमाळा, सांगोला व माळशिरस तालुक्यांमध्ये अंगणवाडीच्या मंजूर वर्ग खोल्यांचे बांधकाम अपूर्ण आहेत. त्यासाठी पावसाळ्यानंतर तालुक्यांचा दौरा करून त्या इमारती पूर्ण करण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला.
14 नोव्हेंबर ते सात एप्रिलदरम्यान राबिवण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ कुपोषण निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण घटले असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांनी सांगितले. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या सदस्या र्शीदेवी पाटील, चन्नव्वा अरवत, सुनीता निमगिरे, सुकेशिनी देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.