आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Death Child Live Again At Solapur Civil Hospital

सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जिवंत बाळास केले होते मृत जाहीर; अहवाल सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी जिवंत बाळास मृत जाहीर केल्याच्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या समितीने शनिवारी अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांना अहवाल सादर केला. अहवालात नेमके काय झाले? ही बाब आणखी गुलदस्त्याच आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी संच उचलला नाही.

हॉस्पिटलमधील प्रकाराची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक एम. एम. जमादार, प्रसूती विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका व्ही. आर. तिरणकर आणि बालरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका एन. एस. भोईर यांची त्रिस्तरीय समिती शुक्रवारी नेमण्यात आली होती. मात्र, संबंधित सर्व कर्मचारी उपस्थित नसल्याने चौकशी पूर्ण झाली नव्हती. शनिवारी समितीने पुन्हा बैठक बोलावून या प्रकरणाची चौकशी करून अधिष्ठातांना अहवाल दिला आहे.

कारण माहीत नसेल तरच शवविच्छेदन
मृत्यूचे कारण माहीत नसेल तरच शवविच्छेदन केले जाते. शस्त्रक्रिया करून जर 24 तासांच्या आत मृत्यू आल्यास शवविच्छेदन करतात. नातेवाइकांची काही शंका असेल तर हॉस्पिटल प्रशासनाकडून याची सर्व माहिती पोलिसांना दिली जाते. त्यानंतर पोलिसांना मृतदेह कागदपत्रांची पूर्तता करून दिला जातो. तसेच नातेवाइकांकडून लिहून घेण्यात येते.’’ डॉ. संजय देशपांडे, अध्यक्ष, आयएमए

बाळाची अवस्था होती खूप नाजूक
उपचारासाठी आलेल्या बाळाला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. त्याची अवस्था खूपच नाजूक होती. त्यामुळे त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्याची नाजूक स्थिती पाहता शवविच्छेदन (पोस्ट मार्टम) करणे अवघड होते. याबाबत बाळाच्या नातेवाइकांशी बोलून निर्णय घेण्यात आला. नातेवाइकांनीही शवविच्छेदन करावयाचे नाही असा निर्णय घेतला.’’
श्रीशैल रणखांबे, एच. आर., स्पॅन हॉस्पिटल