आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लक्ष्मीनारायण आकेन यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर ज्येष्ठरंगकर्मी लक्ष्मीनारायण आकेन (वय ८६, रा. कन्ना चौक) यांचे शनिवारी निधन झाले. सांयकाळी त्यांच्या पार्थिवावर पद्मशाली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या मागे पत्नी मुले नातवंडे सुना असा परिवार आहे. आकेन गेल्या ७० वर्षांपासून नाट्यविश्वात वावरत होते.
आकेन यांचा जन्म १९२९ सालचा. विद्यार्थीदशेत १९४५ मध्ये त्यांनी रंगमंचावर पदार्पण केले. १९४६ ते १९५० मध्ये देवमाणूस नाटकांत जिवबाची भूमिका केली. नाट्य सेवा मंडळातून (कै.) विश्वंभर कन्ना यांच्या दिग्दर्शनाखाली राष्ट्र सेवा दलाच्या सोलापूर जिल्हा कलापथकात काम केले. त्यांनी ‘दौलत’, ‘पुढारी पाहिजे’, ‘पुणेरी जोडा’, आसामी या तेलुगु नाटकात काम केले. अनेक मराठी आणि उर्दू नाटकात काम केले. त्यांनी नागेश कन्ना सुरेश एकबोटे, पद्माकरदेव , लक्ष्मीनारायण बोल्ली, अजय दासरी, नागेंद्र माणेकरी, रेवण उपारे, राजा बागवान आदी कलांवंतासोबत काम केले आहे. नुकताच त्यांनी मनातल्या उन्हात या मराठी चित्रपटात एका म्हाताऱ्याची भूमिका साकरली होती. तो येत्या २६ जुलैला प्रदर्शीत होणार आहे.

दोनदा रौप्य पदके पटकािवली होती. तसेच अनेक भूमिकांना प्रमाणपत्र मिळाले होते. त्यांना व्यवसाय सेवा रोटरी पुरस्कार, ऋषीतुल्य आदी अनेक पुरस्कार मिळाले.