सोलापूर- रेल्वे बोर्डाच्या नियमाप्रमाणे कमी अंतर धावणा-या रेल्वे गाड्यांना पॅन्ट्रीकार जोडता येत नाही. पुणे-मुंबई-पुणे धावणाऱ्या डेक्कन क्वीनला विशेष सवलत देत रेल्वे प्रशासनाने डायनिंग कार जोडली आहे, तर दुसरीकडे डेक्कन क्वीनएवढे आंतर धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसला साधी पॅन्ट्रीकार जोडण्याची मागणी पंधरा वर्षांपासून आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुणे येथे दिले जाते परंतु सोलापूरला का वंचित ठेवले, असा सवाल उपस्थित होत आहे.
मध्यंतरी डेक्कन एक्स्प्रेसची डायनिंग कार खराब झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली. रेल्वे प्रशासनाने तो डबा तत्काळ बदलून दिला. गेल्या १५ वर्षापासून सोलापूरकर हुतात्मा एक्स्प्रेसला पॅन्ट्रीकार जोडण्याची मागणी होत आहे. त्या मागणीकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे.
किमान काउंटर तरी सुरू करा
हुतात्माएक्स्प्रेसची वेळ सकाळची आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डी डी मध्ये काही सीटवरच असे नाश्त्यासाठी काऊंटर उपलब्ध झाले तर प्रवाशांच्या नाश्त्याची सोय होईल.
पुणेला झुकते माप
पुणे-मुंबई हे अंतर १९२ मी इतके आहे. सोलापूर -पुणे अंतर २६२ किमी आहे. तरीही सोलापूरवर अन्याय होत आहे.
जनआहाराचा उपयोग करा. सर्वसामान्य प्रवाशांना चांगल्या दर्जाचे अन्न माफक दरात उपलब्ध व्हावे म्हणून जनआहार योजना सुरू केली. त्यास योग्य प्रतिसाद मिळाल्याने सोलापूर स्थानकावरची योजना बंद आहे. येथील कर्मचाऱ्यांचा उपयोग हुतात्मामध्ये करावा. हुतात्माला पॅन्ट्रीकार जोडण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. जॉनथॉमस, विभागीयरेल्वे व्यवस्थापक या संदर्भात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहे. संजयपाटील,अध्यक्ष. प्रवासीसंघटना.