आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘माळढोक’ क्षेत्राविषयी पुढील महिन्यात निर्णय : जावडेकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज- अगदी थोडक्या माळढोक पक्ष्यांसाठी एवढे मोठे क्षेत्र आरक्षित ठेवणे अव्यवहार्यच आहे. त्यामुळे माळढोक अभयारण्यासाठी आरक्षित क्षेत्राविषयी पुढील महिन्यात निर्णय जाहीर करू आणि तो निर्णय सकारात्मक असेल, असे आश्वासन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले.
सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्यासाठी आरक्षित जमिनीप्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते यांच्या पुढाकारातून प्रकाश जावडेकर आरक्षित तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची रविवारी (दि. २४) पुणे येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी आमदार अजित पवार, आमदार नारायण पाटील, बळीराम साठे, विलास घुमरे, सवितादेवी राजेभोसले, भारत शिंदे, संजय पाटील-घाटणेकर, संजय पाटील-उजनीकर, शहाजी देशमुख आदी उपस्थित होते.
बैलगाडी शर्यत नागपूजेलाही परवानगी
बैलगाडी शर्यती नागपंचमीला होणारी नागपूजा यालाही काही अटींवर परवानगी देण्यात येईल. यासाठी यासंदर्भातील कायद्यात दुरूस्ती केली जाईल, असे जावडेकर यांनी सांगितले. बैलगाडी शर्यत नागपूजा हा श्रद्धेचा पारंपारिक मुद्दा आहे. शेतकऱ्यांएवढे प्रेम बैलावर कोणीही करीत नाही. अंधश्रद्धेचे मुद्दे बाजूला सारून यावरील निर्बंध शिथील करण्यात येतील, असे जावडेकर यांनी सांगितले.
सोलापूर अहमदनगरमधील क्षेत्र (हेक्टरमध्ये)
सोलापूर जिल्हा
तालुका सध्याचे आरक्षण वगळणेचे प्रस्तावित क्षेत्र
उ. सोलापूर ९७१६ ७७६२
मोहोळ २४६०७ २१२९९
माढा २७३५७ २५२१०
करमाळा ११२३७ ७०४९
एकूण ७२९१८ ६१३२१
अहमदनगर जिल्हा
तालुका सध्याचे आरक्षण वगळणेचे प्रस्तावित क्षेत्र
कर्जत २९१९७ १४५५०
श्रीगोंदा २०८१५ १०३२५
एकूण ५०००५ २४९३६
दोन्ही जिल्ह्यांची एकूण आकडेवारी एकूण
१२२९२४ | ८६२५७
बातम्या आणखी आहेत...