आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधात प्रचार केल्याच्या कारणावरून दोघांवर प्राणघातक हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मागील महापालिका निवडणुकीत विरोधात प्रचार केल्यावरून मुस्लिम पाच्छापेठेतील सोशल हायस्कूलजवळ रविवारी दुपारी दोघांवर प्राणघातक हल्ला झाला. फरकान मौनोद्दीन शहापुरे (वय 33) व इरफान शहापुरे (वय 41, दोघे राहणार मुस्लिम पाच्छा पेठ) या दोघांवर शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

नगरसेवक पीरअहमद शेख, आसीफ शेख, अरीफ, रशीद, आयुब (तिघांची पूर्ण नावे नाहीत), जाकीर पैलवान शेख, जावीद शिकलगार, असीन शेख, आय्युम रशीद शेख, इम्रान आयुब शेख, आझम शेख, वशीम शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला. फरकान यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली आहे. विरोधात प्रचार केल्याच्या कारणावरून हॉकी स्टीक, पाइपने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फरकान यांच्या खिशातून साडेसहाशे रुपये व अर्धातोळे सोनसाखळी पळवण्यात आली आहे. इरफान शहापुरे यांचे किडवाई चौकात ज्यूसचे दुकान आहे. त्या ठिकाणी जाऊन मोडतोड करून गल्ल्यातील साडेतीन हजार रुपये पळवून नेले आहेत. शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचीम, सहायक निरीक्षक भरत सूर्यवंशी यांनी शासकीय रुग्णालयात भेट दिली. रात्री जेल रोड पोलिस संशयिताचा शोध घेत होते.