आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूचा डास, राजकीय वास। विरोधकांनी घातला गोंधळ, महापौरांचा केला निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातडेंग्यूचे थैमान सुरू आहे. सोमवारच्या सभेत विरोधकांनी गोंधळ घालत डेंग्यूवर चर्चेची मागणी केली. मात्र, महापौर सुशीला आबुटे यांनी या विषयावर चर्चा करता श्रध्दांजली अर्पण करून सभा तहकूब केली. या प्रकाराने संतापलेले विरोधकांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करत डेंग्यूचा अहवाल असलेल्या प्रती सभागृहात भिरकावल्या. वीस मिनिटे हा गोंधळ सुरू होता.
महापौरांनामॉस्किटो कॉईल भेट
ऑगस्टमहिन्यातील तहकूब सभा सोमवारी बोलावण्यात आली होती. सभागृहात नगरसेवक जगदीश पाटील, इंदिरा कुडक्याल, शिवानंद पाटील, श्रीकांचना यन्नम, नरेंद्र काळे, कृष्णहरी दुस्सा यांनी आपल्या डायससमोर मॉस्किटो कॉईल लावली होती. सभा सुरू होताच या नगरसेवकांनी महापौरांच्या डायससमोरील हौदात जाऊन डेंग्यूबाबत चर्चा घडवा, अशी मागणी केली. मात्र, महापौर आबुटे यांनी जवखेडे हत्याकांड आणि माजी महापौर अलकुंटे यांना श्रद्धांजली अर्पण करून मनपा सभा तहकूब केली. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी महापौर आबुटे यांना कॉईल बाॅक्स भेट देत निषेध व्यक्त केला. शनिवारी महापौरांनी बोलावलेल्या बैठकीत शांत असणारे विरोधक आज मात्र, अचानक आक्रमक झाले. शहरात डेग्यूंचे थैमान सुरू असताना महापौर आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करणाऱ्या विरोधकांचा सभागृहात मात्र या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न दिसून आला.

बैठकीचाफार्स, नुसतीच चर्चा
डेंग्यूबाबतशनिवारी शासकीय सुटी असताना महापौर आबुटे यांनी मनपा बैठक घेतली. त्यात नुसती चर्चा झाली. सोमवारी पुन्हा बैठक घेणार असून त्यावेळी डेंग्यूबाबत अहवाल सादर करा, असे आदेश महापौरांनी दिले होते. मात्र, सोमवारी डेंग्यूवर अहवाल सादर करता या विषयावर पुन्हा चर्चाच झाली. मंगळवारपासून आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन अप्पर आयुक्त विलास ढगे यांनी यावेळी दिले. यावेळी उपमहापौर प्रवीण डोंगरे, स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, सभागृह नेते संजय हेमगड्डी, विरोधी पक्षनेते पांडुरंग दिड्डी यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते. प्रत्यक्ष उपाययोजनेपक्षा आजही चर्चेवर भर असल्याचे दिसून आले.

सत्ताधारी नगरसेवकांचा आरोप
शहरातडेंग्यू आजार चांगलाच फैलावला आहे. आम्ही सत्ताधारी नगरसेवक असून डेंग्यूबाबत माहिती देण्यासाठी प्रशासन बैठक बोलवत नाही. महापौर सभागृहात चर्चेसाठी वेळ देत नाही, असे म्हणत सत्ताधारी पक्षातले नगरसेवक अनिल पल्ली यांनी नाराजी व्यक्त केली.

आजपासून अंमलबजावणी
डेंग्यूरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी मंगळवारपासून शहरात औषध फवारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ७५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. डेंग्यू लागण झालेल्या भागात फवारणी प्राधान्याने करण्यात येईल. पहाटे पाच ते आठ तर सायंकाळी पाच ते सात यावेळेत फवारणी करण्यात येईल. विलासढगे, अप्परआयुक्त, मनपा

डेंग्यूबाबत सभागृहात चर्चा घडवण्यास नकार दिल्याने विरोधी पक्षाने महापौर सुशीला आबुटे यांना मॉस्किटो कॉईल भेट देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी श्रीकांचना यन्नम, विजया वड्डेपल्ली, मंगला पाताळे, जगदीश पाटील, शिवानंद पाटील, पांडुरंग दिड्डी आदी.

डेंग्यूबाबत चर्चा हवी
शहरातडेंग्यू या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या गंभीर प्रश्नावर महापौरांनी सभागृहात चर्चा घडवणे अपेक्षित होते. हा विषय नागरिकांच्या जीवाशी संबंधित होता. परंतु महापौरांनी तसे काही केले नाही. मनोहरसपाटे, नगरसेवक

पुढीलवेळी चर्चा
डेंग्यूआटोक्यात आणण्याचे प्रयत्न मनपाने केले आहेत. वेळोवेळी बैठका घेतल्या. आवश्यक त्या सूचना केल्या. मनपा सभागृहात चर्चा घडवणे अपेक्षित होते असे वाटत असेल तर यापुढे ज्येष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन घेऊ. पल्लींना पुढील बैठकीसाठी बोलवू. सुशीलाआबुटे, महापौर