आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंटल विभागाची दुरवस्था; सिव्हिलच्या डेंटल विभागाची अवस्था दात पडल्यासारखी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल) डेंटल विभागातील कॉम्प्रेसर युनिट गेल्या पाच महिन्यांपासून बंद स्थितीत आहे. त्या विभागात दोन डॉक्टर आणि दोन परिचारिका कामाविना बसून असतात. त्यामुळे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची मोठय़ा प्रमाणात हेळसांड होत आहे. ‘दिव्य मराठी’ने रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली. ‘कोटेशन दिले पण काम होत नाही, याला आम्ही काय करणार’, असे सरकारी उत्तर त्यावर मिळाले. सिव्हिल प्रशासन व डॉक्टरांमधील समन्वयाचा फटका रुग्णांना बसत आहे.
सध्या सिव्हिलमध्ये कामचलाऊ तपासणी सुरू आहे. वरवरची तपासणी करून पंधरा दिवसांनी यायला सांगितले जाते.
दातदुखी सहन होत नाहीय, लवकर उपचार करा, अशी मागणी रुग्णाकडून झाली तर त्यास खासगी रुग्णालयात जायचा सल्ला दिला जातो. खासगी रुग्णालयातील शुल्क सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नसल्याने वेदना सोसत आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. सिव्हिलमध्ये दररोज दातांचे दुखणे घेऊन किमान 10 ते 15 रुग्ण येतात. खासगी रुग्णालयात केवळ तपासणीसाठी 100 ते 200 रुपये घेतले जातात. त्यामुळे खासगी रुग्णालयाची चांदी होत आहे.
डेंटल विभागातील कॉम्प्रेसर युनिटच्या दुरुस्तीचे टेंडर नाशिकच्या तंत्रज्ञाला देण्यात आले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तंत्रज्ञाचा पत्ताच नाही. सिव्हिलमध्ये मोठय़ा प्रमाणात गरजू व गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे त्यांना प्राथमिक उपचार मिळणे आवश्यक आहे. पूर्वी महापालिकेच्या रुग्णालयात दंत वैद्यकीय विभाग होता. कालांतराने तो विभाग बंद करण्यात आला. आता सिव्हिलमधील डेंटल विभाग तरी चालू ठेवणे आवश्यक आहे. ’’ डॉ. विनय चव्हाण, दंत वैद्यकीय