आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नर्सविरुद्ध डॉक्टरांची तक्रार; कारवाई नाही, दंत विभागाकडे होतेय दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दंतिवभागाची कॉम्प्रेसर युनिट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे दात काढण्याशिवाय येथे दुसरे उपचार होत नाही. अत्यावश्यक रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवले जाते. डॉ. प्रथमेश जोशी गेल्यापासून या विभागाला विभागप्रमुख नाही. त्यामुळे याठिकाणी मनमानी कारभार सुरू आहे.
सोलापुरातील शासकीय महाविद्यालयात गेल्या महिन्यात डॉ. किरण जाधव यांनी वरिष्ठांचा त्रास मानसिक ताणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, केवळ वरिष्ठच त्रास देतात असे नाही तर रुग्णालयातील स्टॉफ नर्सही मार्डच्या डॉक्टरांना त्रास देत असल्याची तक्रार डेंटल िवभागातील मार्डच्या दोन डॉक्टरांनी सहा महिन्यांपूर्वीच दिली होती. मात्र, याबाबत अद्याप कार्यवाही झाली नाही. तक्रार करून कारवाईस होणारा विलंब कामाचा मानसिक ताण यामुळेच आत्महत्यासारख्या घटना घडत असल्याचे स्पष्ट होत आहे.
१३ मार्च २०१४ मध्ये डेंटल विभागातील डॉ. ज्योती गोरसे डॉ. स्मिता राठोड यांनी डेंटल विभागातील स्टाफ नर्स रूथ कलबंडी यांच्याकडून होणारा त्रास मानसिक दडपणाबाबत तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांच्याकडे तक्रार दिली होती. कामात हस्तक्षेप करणे, ओळखीच्या रुग्णावर उपचारासाठी दडपण आणणे, संघटनेचे आणि राजकीय दडपण आणणे, असे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, अधिष्ठाता शिंदे यांनी कार्यवाही केली नाही. शिवाय डेंटल विभागाचे प्रमुख डॉ. प्रथमेश जोशी त्यांच्या सहकार्यानी शिंदे यांच्याकडे लेखी तक्रारी दिली होती.
हेतुपुरस्सर आरोप
रुग्णांनाव्यवस्थित उपचार देत नव्हते. अरेरावीची भाषा डॉ. प्रथमेश जोशी करत असतात. त्यांना वेळोवेळी सूचना दिली तरी उलट उत्तर देत होते. रुग्णांच्या सेवेला प्रथम प्राधान्य देतो. हेतुपुरस्सर हा आरोप करण्यात आला आहे. रूथकलबंडी, नर्स