आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Department Of Prevention Of Corruption Create Facebook Page At Solapur

लाचखोरी थांबवण्यासाठी करा फेसबुक, इ-मेल, टोल फ्रीचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शासकीय,निमशासकीय कामासाठी जर कोणी आपल्याला लाच मागितली तर आता आपण बसल्या ठिकाणी ऑनलाइन तक्रार देऊ शकता. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महासंचालक कार्यालयाने फेसबुकवर तक्रार देण्यासाठी स्वतंत्र पेज अपलोड केले आहे. शिवाय ईमेल, टोल फ्री नंबरची सोयही आहे. या नवीन बदलामुळे नागरिकांमध्ये जनजागृती वाढली आहे. म्हणजे २०१३ या वर्षात १९ तर २०१४या वर्षातील नऊ महिन्यातच ३३ ट्रॅप झालेत.
महिन्यांतील विभागनिहाय झालेले ट्रॅप
महसूल विभाग आघाडीवर
लाचघेण्यात महसूल विभाग आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्या खालोखाल पोलिस विभाग आहे. साहाय्यक निरीक्षक फौजदार या दर्जाचे अधिकारी यात जेरबंद झाले आहेत. आरोग्य शिक्षण विभागातही लाच घेण्याचे प्रमाण जास्त आहे.
कशी तक्रार नोंदवाल
गुगलवर अथवा थेट फेसबुकवर जाऊन महाराष्ट्र अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो लॉगइन केल्यानंतर मुख्य पान येईल. पुढे तक्रार नोंदवण्यासाठी फॉर्म आहे. त्यावर आपली संपूर्ण माहिती दिल्यानंतर सबमीट करा. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी त्याआधारे तपास करू शकतात. ई-मेल अथवा टोल फ्री (१०६४) नंबरवरही माहिती देऊ शकता. प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र माहिती देण्याची सोय आहे. शिवाय पोलिस महासंचालक (एसीबी विभाग) येथेही तक्रार देऊ शकता. फोन नंबर ०२१७-२३१२६६८, मोबाइल- ९४०४६६२४९८ या नंबरवर माहिती द्या.
शासकीय निमशासकीय कार्यालयात कोणी कामासाठी पैसे अथवा लाच मागत असतील तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी. फेसबुक, ईमेल, दूरध्वनीवरून माहिती दिल्यास कारवाई करू.” गणेशजवादवाड, उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग