आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाताना नऊ, तर परतताना 11 तास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शनिवारपासून सुरू होणार्‍या सोलापूर-मुंबई गाडीचे वेळापत्रक निश्चित झाले असून दिल्ली रेल्वे बोर्डाकडून सोलापूर कार्यालयाला संदेशही मिळाला आहे. सोलापूरहून मुंबईला पोहोचण्यास नऊ तासांचा तर परतीचा प्रवास 11 तासांचा असेल. आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावणार आहे. या नवीन गाडीचा क्रमांक (सोलापूर - मुंबई 11306) व (मुंबई ते सोलापूर 11305) असा आहे. सोलापूरहून ही गाडी रात्री 8.25 वाजता मुंबईसाठी निघेल. मुंबईला पहाटे 5.15 वाजता पोहोचेल. मुंबईहून रात्री 9.15 वाजता निघून सोलापूरला सकाळी 8.05 मिनिटांनी पोहोचेल. पनवेलहून जाणार की कल्याणमार्गे हा प्रश्न अंतिम निकाली लागला असून गाडी कल्याणहून मुंबईत पोहोचेल.
गाडीच्या डब्यांची रचना

द्वितीय श्रेणी वातानुकूलित 1 डबा, तृतीय श्रेणी वातानुकूलित 3 डबे, 4 शयनयान, 2 सर्वसाधारण व 2 एसएलआर असे एकूण 12 डब्यांची ही गाडी असणार आहे.
नव्या गाडीचे दर

द्वितीय श्रेणी वातानुकूलित - 900

तृतीय श्रेणी वातानुकूलित - 630

शयनयान - 235

सर्वसाधारण व एसएलआर - 105


शुक्रवारपासून आरक्षण
गाडीचा क्रमांक प्राप्त झाल्याने शुक्रवारपासून गाडीचे आरक्षण सुरू होईल. 12 डब्यांची एक्स्प्रेस दर्जाही ही गाडी आहे. नियोजनाप्रमाणे सायंकाळी सात वाजता गाडीचा उद्घाटन समारंभ असेल. प्रत्यक्षात वेळेनुसार रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी सोलापुरातून मार्गस्थ होईल. सुशील गायकवाड, वरिष्ठ विभागीय दळणवळण व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे