आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेम अन् जातीव्यवस्थेचे वास्तव चित्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-कोमल वयात फुललेले प्रेम आणि ग्रामीण भागात आजही जपली जाणारी जाती व्यवस्था याचे चित्र फॅं ड्री चित्रपटात पाहायले मिळते. कल्पक दिग्दर्शन, वास्तवादी चित्रण आणि कसदार अभिनयाने फुलत जाणार्‍या प्रेमकथेला व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
असे आहे कथानक
वडार समाजाच्या एक महत्त्वकांक्षी मुलगा जामवंत (सोमनाथ अवघडे) याच्या भोवती फॅंड्रीची कथा फिरते. समाजाकडून मिळणारी अवेहना आणि पोटची खळगी भरण्यासाठी आई-वडिलांचा सुरू असलेला दररोजचा संघर्ष जामवंत पाहत असतो. या काळात जामवंतचे गावातील एका मुलीवर प्रेम जडते. या अव्यक्त प्रेमातून चित्रपट खुलत जातो. पुढे या प्रेमाला समाजातील जाती व्यवस्था, पत-प्रतिष्ठा या वृत्तीचा सामना करावा लागतो. यातून एक संघर्ष निर्माण होतो.
दज्रेदार अभिनय
या चित्रपटात मुख्य भूमिका साकरणारा सोमनाथ हा प्रत्यक्ष आयुष्यात हलगी वाजवण्याचे काम करतो. मात्र, या चित्रपटात त्याने सहज आणि वास्तववादी अभिनय करून वेगळा ठसा उमटवला आहे. शिवाय अनेक आतंरराष्ट्रीय महोत्सवात त्याने उत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. तर चित्रपटात जामवंतच्या वडिलांची भूमिका किशोर कदम यांनी, तर आईची छाया कदम यांनी दमदारपणे केली आहे. तर एकही संवाद नसताना अभिनेत्री रार्जशी खरा ही
भाव खाऊन जाते.
कल्पक दिग्दर्शन : समाजातील ग्रामीण जीवन दाखवताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची कल्पकता दिसून येते. ग्रामीण भागातील निसर्गसौंदर्य, जीवनशेैली, प्रसंगातील विदारकता याचे उत्तम सादरीकरण चित्रपटात पाहायला मिळते. विशेषत: सायकल चिरडण्याचा प्रसंग, डुक्कर (फँड्री ) धरण्याचा प्रसंग, जामवंतच्या छोट्या अपेक्षाचे चित्रण करणारे प्रसंग खूप बारकाव्याने टिपले आहेत.
समाजव्यवस्थेचे चित्रण मांडले आहे. संतोष कुमठाळ, विद्यार्थी
उत्तम कथानक तसेच कलाकारांच्या उत्कृष्ठ अभिनयाला दाद. सागर कासार, विद्यार्थी