आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दूषित पाणी; उपअभियंता निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- रेल्वे स्टेशन परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशी तक्रार घेऊन महिला, नागरिक शुक्रवारी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे आले. पाच दिवसांपासून पाणी आले नाही. शेजारच्या भागात व्यवस्थित पाणी पुरवठा होता. शुक्रवारी पाणी आले, तेही दूषित, अशी तक्रार नागरिकांची होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी झोन क्रमांक आठचे उपअभियंता बी. बी. भोसले यांच्या निलंबनाचे आदेश शनिवारी काढले.
आयुक्तांनी महिलांना सकाळी कार्यालयात बोलावले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. स्थितीविषयी नगरसेवक आरिफ शेख, प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे, उपअभियंता आर. बी. रेड्डी यांनी माहिती दिली. दूषित पाणीपुरवठा होतो, तो कमी दाबाने, पाण्याला वास येतो आदी तक्रार महिलांची होती. त्यानंतर आयुक्त काळम-पाटील यांनी झोनचे उपअभियंता भोसले यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
आयुक्त म्हणाले, रात्री कोणी घरी येऊ नये
मागीलमहिन्यात पाच ते सहा मोर्चा घरासमोर आणण्यात आले. नागरिक रात्री येत आहेत. कोणीतरी मुद्दाम पाठवतात. तसे होऊ नये. रात्री कोणी येऊ नये. पाण्याचे नियोजन महापालिका करत असल्याचे आयुक्त काळम-पाटील यांनी या वेळी सांगितले.
आमच्याकडे का नाही?
काडादीचाळीच्या बाजूच्या भागात पाणी पुरवठा सुरळीत आहे. स्वागत नगरला पाणी येते. शहरात अनेक भागांत आमचे नातेवाईक आहेत. त्यांच्याकडे पाणीपुरवठा नियोजित वेळेत आहे. आमच्याकडे नाही. महापालिका अधिकारी पाणी सोडत नाहीत, नियोजनात त्रुटी अाहे. आमच्याकडे नगरसेवक येत नाहीत, अशी तक्रार सुनीता चंचलेकर यांनी केली. या वेळी जनाबाई अकुंशराव, सुनीता कणेरी, कमलाबाई वाले, वैशाली जगताप आदी महिला उपस्थित होत्या.
रेल्वे स्टेशनजवळील काडादी चाळीत पाणीपुरवठा विस्कळित आहे. पाणी वेळेवर येत नाही त्यामुळे तेथील महिला महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे तक्रार करताना. या वेळी नगरसेवक आरिफ शेख, प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे आदी.
नागरिकांची मागणी रास्त, आरोप चुकीचा
- काडादी चाळ परिसरात शेवटचा टप्पा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यांची मागणी रास्त आहे, पण मी त्या परिसरात भेट देत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे.”
आरिफ शेख, नगरसेवक
यापुढे कारवाई
- कामात हयगय केली. दूषित पाणी दिल्याने उपअभियंता बी. बी. भोसले यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे कोणत्याही अधिकाऱ्यांची तमा बाळगणार नाही.”
विजयुकमार काळम-पाटील, आयुक्त, महापालिका
बातम्या आणखी आहेत...