आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी परत गेल्यास ७१ कामांवर होणार परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना (जिल्हास्तर) अंतर्गत महापालिकेने त्याचा हिस्सा भरला नाही. या कारणाने राज्य सरकारने कामे रद्द केल्यास त्यांचा परिणाम शहरातील नागरी सुविधेच्या ७१ कामांवर होणार आहे. या सर्व कामाची रक्कम फेब्रुवारी ते मार्च २०१४ मध्ये दिली. त्यानंतर महापालिकेने प्रक्रिया केली आहे. कामाची मुदत अद्याप असून, त्यासाठी महापालिका आपला हिस्सा टप्याटप्याने भरेल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्हास्तर नगरोत्थानचे ४९.७४ कोटींची कामे शासनाने मंजूर केली असून त्यात शासन आणि मनपा ५० टक्के हिस्सा असतो. मनपाने हिस्सा भरला नाही यासाठी २४.८८ काेटी निधी परत जाण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील ७१ कामांवर परिणाम होणार आहे. त्या कामाची प्रक्रिया करण्यास मनपा मुख्य लेखापाल कार्यालयाचे बजेट अभिप्राय, मनपा सभेची मान्यता, स्थायी समितीची मान्यता घेण्यास विलंब लागतो. त्यानुसार प्रक्रिया करून महापालिकेने कामाला सुरुवात केली आहे.

‘एमएसआरडीसी’मार्फत रस्ते
रस्त्याच्या पाच कामात ‘एमएसआरडीसी’तर्फे शहरातील रस्ते करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या रस्त्याची दयनीय झालेली अवस्था सुधारली. त्या कामासह इतर निधी परत गेल्यास महापालिका अडचणीत येणार आहे.

निधी परत जाऊ देणार नाही
यात महापालिकेची चूक असून, मनपाचा हिस्सा वेळेत भरला नाही. पण महापालिका टप्याटप्याने निधी भरणार आहे. विभागीय आयुक्तांना याबाबत कल्पना दिली आहे. निधी परत जाऊ देणार नाही.” विजयकुमार काळम-पाटील, आयुक्त

अशी आहेत कामे (कंसात रक्कम कोटीत)
एकूण : ७१ (४९.७४)
रस्ते : (१७.४७)
स्मशानभूमी : (५.९६)
उद्याने : १३ (६.४९)
पाणी पुरवठा ड्रेनेज : ४४ (१९.८७)
बातम्या आणखी आहेत...